इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:26 IST2026-04-20T17:26:31+5:302026-04-20T17:26:50+5:30

IRGC takes control of Iran : इराणमध्ये लष्करी उठाव? राजनैतिक व्यवस्थेवर IRGC चा ताबा; मेजर जनरल अहमद वाहिदी बनले सर्वात शक्तिशाली व्यक्ती, जगावर महायुद्धाचे सावट

IRGC takes control of Iran : The throne has changed in Iran...! The Islamic Revolutionary Guard Corps took control of the country; Abbas Araghchi fell to the side | इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 

इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 

इराणमध्ये पडद्यामागे सुरू असलेल्या हालचाली आता समोर आल्या आहेत. अमेरिकेने केलेली युद्धबंदी बुधवारी संपत असताना आणि पाकिस्तानात चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होत असताना इराणमध्ये 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' राजसत्तेवर पूर्णपणे कब्जा मिळविला आहे. आयआरजीसीचे मेजर जनरल अहमद वाहिदी हे इराणचे सर्वात शक्तिशाली नेते बनले आहेत. यामुळे जगावर महायुद्धाचे संकट घोंघावू लागले आहे. 

 

अमेरिकेने होर्मुझमध्ये इराणच्या जहाजावर हल्ला करून पुन्हा युद्धाला तोंड फोडले आहे. अमेरिकेचा अशाप्रकारे चीनहून इराणला येत असलेल्या जहाजावर ताबा मिळविणे इराणला पटलेले नाही. युद्धबंदी सुरु असताना अमेरिकेने हे उल्लंघन केल्याचा आरोप करत इराणने पाकिस्तानला चर्चेला जाण्यास नकार दिला आहे. यामुळे इराण चर्चेला जाणार की युद्ध सुरु करणार याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.  

अमेरिकन थिंक टँक 'इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर'च्या मते, जनरल वाहिदी यांनी इराणच्या लष्करी तंत्रासह राजनैतिक वाटाघाटींची सूत्रेही आपल्या हाती घेतली आहेत. याला सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची मूक संमती असल्याचे सांगितले जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे हॉर्मुझचा समुद्री मार्ग उघडण्यास अनुकूल होते. मात्र, IRGC ने हा निर्णय धुडकावून लावत उलट आपल्या 'फास्ट अटॅक शिप्स'च्या माध्यमातून हा मार्ग पूर्णपणे ब्लॉक केला आहे.

राजनैतिक टीमला परत बोलावले

इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत सुरू असलेल्या चर्चेत कट्टरपंथी नेते मोहम्मद बागेर जोलगाद्र यांना 'हेर' म्हणून पाठवण्यात आले होते. जोलगाद्र यांनी परराष्ट्र मंत्री अराघची हे 'नरम' पडत असल्याची तक्रार तेहरानला केली, त्यानंतर संपूर्ण डेलिगेशनला तातडीने परत बोलावण्यात आले आहे.

होर्मुझमध्ये भीषण नाकेबंदी
गेल्या ४८ तासांत इराणच्या लष्कराने या मार्गावरून जाणाऱ्या तीन जहाजांना लक्ष्य केले आहे. यामुळे शेकडो मालवाहू जहाजे पर्शियन आखातात अडकून पडली आहेत. सॅटेलाईट डेटानुसार, या मार्गावरून सध्या केवळ इरानी जहाजांचीच हालचाल सुरू आहे, मात्र ती देखील अमेरिकन नाकेबंदी रेषेच्या जवळ जाण्याचे धाडस करत नाहीत.

महायुद्धाचा धोका वाढला
बुधवारची डेडलाईन जवळ येत आहे आणि इराणने चर्चेची पुढची फेरी फेटाळून लावली आहे. अमेरिकेच्या मागण्या अवास्तव असल्याचा ठपका IRGC ने ठेवला आहे. वॉशिंग्टनच्या तज्ज्ञांनुसार, इराणमधील या अंतर्गत सत्तापालटानंतर आता अर्थपूर्ण चर्चेची शक्यता संपली असून, अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा मोठा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Web Title : ईरान में सत्ता परिवर्तन: रिवोल्यूशनरी गार्ड का नियंत्रण, तनाव बढ़ा

Web Summary : ईरान के रिवोल्यूशनरी गार्ड (आईआरजीसी) ने सत्ता पर कब्ज़ा कर लिया है. अमेरिकी जहाज जब्ती के बाद ईरान ने वार्ता से इनकार कर दिया, जिससे तनाव बढ़ गया. बाधित वार्ता और होर्मुज जलडमरूमध्य के अवरुद्ध होने के बीच एक बड़े संघर्ष का खतरा मंडरा रहा है.

Web Title : Iran Power Shift: Revolutionary Guard Seizes Control, Tensions Rise

Web Summary : Iran's Revolutionary Guard (IRGC) has reportedly seized power, sidelining moderates. Tensions escalate as Iran rejects talks after a US ship seizure. A major conflict looms amid stalled negotiations and a blocked Hormuz Strait.