Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:59 IST2026-04-20T17:54:58+5:302026-04-20T17:59:35+5:30

Navi Mumbai Viral Video: नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याचा मस्तवालपणा दाखवणारा व्हिडीओ समोर आला आहे. अधिकाऱ्याने थेट बसमध्ये शिरून बसचालकाला मारहाण केली. 

Video: He entered a running train, hit the driver under the ear; RTO officer's domineering behavior in Navi Mumbai | Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 

Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 

ट्रॅव्हल बस थांबवण्याच्या आधीच आरटीओ अधिकारी आत शिरतो आणि सपासप चालकाला मारत सुटतो. हे सगळं चालकाच्या कॅबिनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. नवी मुंबईतील या घटनेनंतर आरटीओ अधिकाऱ्याच्या दबंगगिरीवर लोक संताप व्यक्त करत आहेत. 

ही घटना घडली आहे नवी मुंबईतील कळंबोलीमध्ये. उड्डाणपूल संपल्यानंतर महामार्गावरच ट्रॅव्हल्सचा थांबा आहे. रात्री असंख्य बस, ट्रॅव्हल्स आणि इतर खासगी वाहने इथे थांबतात. अनेक प्रवासी गावी जाण्यासाठी येथून बस पकडतात. 

व्हिडीओ बघा 

मॅकडोनाल्ड्सजवळच हा थांबा आहे. तिथे ट्रॅव्हलचा चालक बस रस्त्याच्या कडेला घेत होता. त्याचवेळी आरटीओ अधिकारी बसमध्ये शिरला आणि त्याने थेट मारहाण सुरू केली. बस चालकाने त्याला बस बाजूला घेत असल्याचे सांगितले. त्यानंतरही अधिकाऱ्याने त्याला मारहाण केली. बसमधून खाली उतरवल्यानंतरही त्याला मारहाण करण्यात आली. 

दरम्यान, अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, बसचालक माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी म्हटले आहे की, कदाचित बसवाल्याकडून त्याचा हफ्ता कमी आला असेल. तर काहींनी म्हटले आहे की, पोलीस गणवेशात असलेले गुंडच आहेत. तर काहींनी म्हटले आहे की, बसचालकही खूप निष्काळजीपणे गाड्या चालवत असतात. 

Web Title : नवी मुंबई: आरटीओ अधिकारी ने बस ड्राइवर को पीटा, वीडियो वायरल

Web Summary : नवी मुंबई में आरटीओ अधिकारी ने चलती बस में ड्राइवर को पीटा। घटना कलंबोली में हुई, जहां अधिकारी बस में घुसा और मारपीट की। वीडियो वायरल होने के बाद लोगों में गुस्सा है। अधिकारी का दावा है कि ड्राइवर ने उसे कुचलने की कोशिश की।

Web Title : Navi Mumbai: RTO officer assaults bus driver in shocking video.

Web Summary : An RTO officer in Navi Mumbai was caught on CCTV assaulting a bus driver. The incident occurred in Kalamboli after the officer entered the moving bus. Public outrage is growing following the video's release. The officer claimed the driver tried to run him over.