TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:37 IST2026-04-20T17:31:54+5:302026-04-20T17:37:50+5:30

दरम्यान, एका पीडित महिला कर्मचाऱ्याने छळवणुकीचा जो काही थरार सांगितला आहे, तो अत्यंत धक्कादायक आणि अक्षरशः हादरवून टाकणारा आहे...

TCS Nashik case Player Zero Figure I will fulfill your physical needs Shahrukh, Raza, Asif's actions shook the victim | TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...

TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...

देशातील प्रतिष्ठित टेक कंपनी असलेल्या टीसीएसच्या (TCS) नाशिक युनिटमधून समोर आलेल्या धर्मांतरण आणि लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी वेगाने तपास सुरू असून पोलिसांनी आतापर्यंत ९ एफआयआर दाखल केल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी एका महिला ऑपरेशन मॅनेजरसह ८ जणांना अटक केली आहे. दरम्यान, एका पीडित महिला कर्मचाऱ्याने छळवणुकीचा जो काही थरार सांगितला आहे, तो अत्यंत धक्कादायक आणि अक्षरशः हादरवून टाकणारा आहे.

"तुझा पती दूर असतो, मग तू..." -
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, २० जून २०२५ रोजी तिचे लग्न झाले. यानंतर तिने नाशिक टीसीएसमध्ये कामाला सुरुवात केली. प्रशिक्षणादरम्यान शाहरुख कुरैशी आणि जयेश गुंजाल तिचे लीडर होते. पीडितेचा पती पुण्यात नोकरी करत होता. तर ती नाशकात सासरी होती. याच काळात लोन ब्रँचचा टीम लीडर रजा मेनन विनाकारण तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. "तुझा पती दूर असतो, मग तू सर्व कसं मॅनेज करतेस? तुला भीती वाटत नाही का? काही गरज लागली तर मला सांग, मी कुठल्याही वेळी मदतीसाठी उपलब्ध असेन," असे म्हणत तो तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत होता.

साडी ओढण्याचा प्रयत्न अन्... -
लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, रजा मेननने पीडितेला 'प्लेयर' असे नाव दिले होते. तो हनिमूनबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही अश्लील प्रश्न विचारायचा. "तुझे अत्ताच लग्न झाले आहे. हनीमूलना कुठे जारण? तेथे काय काय करणार?" असे अश्लिल प्रश्न रजा विचारायचा. त्याला शाहरुख कुरैशी प्रोत्साहन द्यायचा. एकदा तर, पॅन्ट्रीजवळून जात असताना रजाने पीडितेची साडी ओढण्याचाही प्रयत्न केला. 

याशिवाय, आसिफ नावाचा कर्मचारीही जबरदस्तीने तिच्या जवळ येऊन बसायचा आणि खांद्यावर, कंबरेला किंवा पोटाला स्पर्श करायचा. तिला 'झिरो फिगर' म्हणत तो तिच्या शरीरासंदर्भातही अश्लील भाष्य करायचा.

धर्मांचा आणि देवाचा अपमान -
आरोपींकडून केवळ शारीरिक छळच नव्हे तर, धार्मिक भावना दुखावणारे कृत्यही केले जायचे. "लग्नाआधी तुझे बॉयफ्रेंड असतीलच, मग आता एक अजून झाला तर काय अडचण आहे? तुझ्या शारीरिक गरजा मी पूर्ण करेन," अशी लज्जास्पद विधानही आसिफने केल्याचा धक्कादायक आरोप पीडितेने केला आहे. 

महत्वाचे म्हणजे, आरोपी हिंदू देवतांबद्दलही आक्षेपार्ह भाष्य करायचे. मानसिक त्रास द्यायचे. नोकरी जाण्याच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला मौन बाळगले. आता पोलिसांच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकारचे वास्तव समोर येत आहे.

 

Web Title : टीसीएस कांड: नासिक इकाई में यौन उत्पीड़न और धार्मिक अपमान।

Web Summary : टीसीएस नासिक की एक कर्मचारी को उत्पीड़न का सामना करना पड़ा: अनुचित टिप्पणियाँ, अवांछित स्पर्श और धार्मिक अपमान। आरोपियों में रजा मेनन, शाहरुख कुरैशी और आसिफ शामिल थे। पुलिस कई एफआईआर वाले मामले की जांच कर रही है।

Web Title : TCS Scandal: Sexual harassment and religious insults in Nashik unit.

Web Summary : A TCS Nashik employee faced harassment: inappropriate comments, unwanted touching, and religious insults. Accused individuals included Raza Menon, Shahrukh Qureshi and Asif. Police are investigating the case involving multiple FIRs.