छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:23 IST2026-04-20T16:22:18+5:302026-04-20T16:23:31+5:30

Private Plane Crash in Jashpur: छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील आरा टेकड्यांमध्ये एक खाजगी चार्टर्ड विमान कोसळले आहे. डोंगराला धडकल्यानंतर विमानाने पेट घेतला असून वैमानिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Private Plane Crash in Jashpur: Private plane crashes in Chhattisgarh! Plane explodes after hitting Jashpur mountain range | छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...

छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...

जशपूर (छत्तीसगड): छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात सोमवारी दुपारी एका चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात झाला. हे विमान आरा टेकड्यांमधील रतनपहली जंगलात झाडांना आणि डोंगराला धडकल्याने कोसळले. अपघातानंतर विमानाने पेट घेतला असून डोंगर परिसरातून धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत आहेत. या अपघातात विमानातील वैमानिक आणि सह-वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हे विमान नारायणपूर क्षेत्रातील रतनपहली जंगलावरून जात असताना अचानक डोंगराच्या दिशेने झुकले आणि वेगाने डोंगररांगांना जाऊन धडकले. धडक इतकी जोरात होती की विमानाचे तुकडे झाले आणि त्याला भीषण आग लागली. डोंगराळ आणि जंगल परिसर असल्याने मदतकार्यात सुरुवातीला अनेक अडचणी येत होत्या.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकरी आणि पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विमानात एकूण किती लोक होते, याची अधिकृत माहिती अद्याप प्रशासनाकडून मिळालेली नाही, मात्र वैमानिकांचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

तपासाचे आदेश
हे विमान कोणाचे होते आणि कुठून कुठे जात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. डीजीसीए कडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

Web Title : छत्तीसगढ़ में चार्टर्ड विमान दुर्घटनाग्रस्त, जशपुर में भीषण विस्फोट!

Web Summary : छत्तीसगढ़ के जशपुर जिले में एक चार्टर्ड विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें पायलट और सह-पायलट की मौत हो गई। विमान रतनपहाड़ी जंगल में पहाड़ियों से टकरा गया, जिससे भीषण विस्फोट हुआ। दुर्घटना के कारणों की जांच जारी है।

Web Title : Chhattisgarh Chartered Plane Crashes in Jashpur, Explodes on Impact

Web Summary : A chartered plane crashed in Chhattisgarh's Jashpur district, killing the pilot and co-pilot. The plane hit hills in Ratanpahari forest, causing a massive explosion. Investigation underway to determine the cause of the accident.