Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...

Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...

एका ७४ वर्षांच्या महिलेने आपल्या जिद्दीने सर्वांना थक्क केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:32 IST2026-04-20T17:32:09+5:302026-04-20T17:32:53+5:30

एका ७४ वर्षांच्या महिलेने आपल्या जिद्दीने सर्वांना थक्क केलं आहे.

73 year old woman paragliding viral video age is just number | Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...

Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...

बहुतेक लोक वयाची सत्तरी ओलांडल्यानंतर आरामाला प्राधान्य देतात. असं असताना एका ७४ वर्षांच्या महिलेने आपल्या जिद्दीने सर्वांना थक्क केलं आहे. हिमाचल प्रदेशातील बीर बिलिंग येथे आजींनी कोणताही संकोच न बाळगता पॅराग्लाइडिंग केलं. आजींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पॅराग्लाइडिंग इन्स्ट्रक्टर अरुण सिंह यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ते आजींना त्यांचं वय विचारतात, ज्यावर त्या पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर देतात. संवादादरम्यान त्या सांगतात की, त्यांनी यापूर्वी मसुरीमध्येही असा अनुभव घेतला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही, तर फक्त उत्साह आणि काहीतरी नवीन करून पाहण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येतो.

या अनुभवाला 'युनिक' म्हणत त्या क्षणाचाही विलंब न लावता उड्डाणासाठी तयार होतात. काही वेळातच त्या हिमालयाच्या सुंदर दऱ्यांमधून शांतपणे आणि उत्साहाने उडताना दिसतात. ज्या साहसी खेळाला अनेक तरुणही घाबरतात, तो खेळ त्यांनी अत्यंत सहजतेने पूर्ण केला. मस्त वाटतंय असं आजींनी म्हटलं आहे. 


व्हिडिओमधील बीर बिलिंगचं विलोभनीय दृश्य अधिक आकर्षक आहे, पण खऱ्या अर्थाने या व्हिडिओतील विशेष म्हणजे आजींचा अढळ आत्मविश्वास. पोस्ट केल्याच्या अवघ्या काही तासांतच या व्हिडिओला २.१२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर युजर्स त्यांना 'प्रेरणास्थान' मानत आहेत. कोणी लिहित आहे की, 'वय हा केवळ एक आकडा आहे', तर कोणी 'दादी रॉक्स' म्हणत त्यांचं कौतुक करत आहे.

काही जणी तर 'भविष्यात मला असंच बनायचं आहे' अशी इच्छाही व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ केवळ एक व्हायरल क्लिप नसून तो विचार बदलायला लावणारा मेसेज आहे. नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं हेच यातून सिद्ध होतं. जर मनात जिद्द आणि कुतूहल असेल, तर आयुष्य कोणत्याही वळणावर नवी उंची गाठू शकतं.
 

Web Title : 74 वर्षीय दादी ने हिमाचल में की पैराग्लाइडिंग, उम्र सिर्फ एक संख्या!

Web Summary : हिमाचल प्रदेश के बीर बिलिंग में 74 वर्षीय महिला ने निडरता से पैराग्लाइडिंग की, जिससे कई लोगों को प्रेरणा मिली। वीडियो में उनका उत्साह दिखाई देता है, जो साबित करता है कि उम्र रोमांच के लिए कोई बाधा नहीं है। उन्होंने पहले मसूरी में भी ऐसा ही अनुभव लिया था, आत्मविश्वास और आनंद का प्रदर्शन करते हुए, दूसरों को नए अनुभवों को अपनाने के लिए प्रोत्साहित किया।

Web Title : 74-year-old Grandma Paraglides in Himachal, proving age is just a number!

Web Summary : A 74-year-old woman fearlessly paraglided in Bir Billing, Himachal Pradesh, inspiring many. The video shows her enthusiasm, proving age is no barrier to adventure. She previously enjoyed a similar experience in Mussoorie, displaying confidence and joy, encouraging others to embrace new experiences.