महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

Updated:April 20, 2026 15:30 IST2026-04-20T15:22:11+5:302026-04-20T15:30:04+5:30

महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

तिशी- पस्तिशीपर्यंत अंगात उत्साह असतो. कितीही कामं अंगावर येऊन पडली तरी ती धडाक्यात उरकली जाऊ शकतात. पण जशी पस्तिशी ओलांडली जाते, तसं तसं कित्येकींना जास्तीची कामं सहन होत नाहीत.

महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

लगेच थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो. खरंतर चाळिशी हे काही थकण्याचं वय नाही. पण त्यावेळी शरीरात कित्येक पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण झालेली असते. त्यामुळे मग एनर्जी कमी पडते. हे टाळायचं असेल तर काही पदार्थ महिलांनी अगदी रोज नियमितपणे खायलाच हवे. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहुया..

महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तीळ. १ चमचा तीळ रोज खायला हवे. त्यामुळे हार्माेन्स नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराला भरपूर कॅल्शियम मिळते.

महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

भोपळ्याच्या चमचाभर बियाही तुम्हाला खूप फायदे देतात. पीसीओएस, थायरॉईड यासारख्या समस्या कमी करण्यासाठी त्या उपयोगी ठरतात.

महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

ब्राझील नट्सही खूप पौष्टिक असतात. पुर्ण दिवसातून ते एक किंवा दाेन एवढेच खा. त्यातुन मिळणारं सेलेनियम थायरॉईडचे त्रास कमी करण्यासाठी मदत करतं.

महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

१ चमचा सब्जा किंवा चिया सीड्सही नियमितपणे खा. यातून लोह भरपूर प्रमाणात मिळते. तसेच मासिक पाळीच्या कित्येक समस्याही कमी होतात. त्यात फोलिक ॲसिडही चांगल्या प्रमाणात असते.

महिलांसाठी सुपरफूड असणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहिती आहेत का? रोज खा- ठणठणीत राहाल

शरीरातील हार्माेन्सचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी रोज जवसही खायला हवे. ते अख्खे न खाता चटणीच्या स्वरुपात खाणे अधिक चांगले असते, असे एक्सपर्ट सुचवतात.