रागीट लोकांमध्ये असतात 'हे' ८ गुण; तुम्हीही असे वागत असाल तर खूपच चिडखोर आहात...!
Updated:April 19, 2026 13:22 IST2026-04-19T13:02:21+5:302026-04-19T13:22:35+5:30
Inside The Mind Of An Angry Person :

रागीट व्यक्तीच्या वर्तनाकडे आपण ओरडणं किवा भांडणं म्हणून पाहतो पण रागीट स्वभावाच्या व्यक्तीमध्ये काही सुक्ष्म आणि वेगळे गुणधर्म असतात. (8 Psychological red Flags Of Chronic Anger)
अवास्तव अपेक्षांची ओझी
रागीट व्यक्ती अनेकदा स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल खूप जास्त अपेक्षा ठेवतात. जेव्हा वास्तव या अपेक्षांशी जुळत नाही तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो आणि राग येतो. (Inside The Mind Of An Angry Person)
नियंत्रणाची तीव्र इच्छा
परिस्थिती आणि माणसं आपल्या सांगण्यांनुसारच चालली पाहिजेत असा अट्टहास असणं.
टोकाचे विचार
कोणत्याही विषयाचा मधला मार्ग न काढता एकतर पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट असा विचार करणं
असुरक्षितात लपवणं
मनातली भिती किंवा दु:ख दाखवण्याऐवजी रागाचा मुखवटा घालून स्वत:चा बचाव करणं.
संयम नसणं
परिणामांचा विचार न करता भावनेच्या भरात तात्काळ आणि तीव्र प्रतिक्रिया देणं.
अति संवेदनशीलता
इतरांच्या साध्या बोलण्याचा किंवा विनोदाचाही अपमान झाला आहे असा चुकीचा अर्थ काढणं.
अन्यायाची भावना
आपल्यासोबत नेहमीच काहीतरी चुकीचे किंवा अन्यायकारक घडत आहे असं सतत वाटत राहणं.
शारीरिक ताण-तणाव
रागामुळे शरीर सतत तणावाखाली असणे आणि स्नायूंमध्ये कडकपणा जाणवणे अशी लक्षणं जास्त रागावणाऱ्या व्यक्तीमध्ये दिसून येतात.