‘पक पक पकाक’ मधील 'साळू' आठवतेय? आता कशी दिसते, २१ वर्षात इतका बदलला लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:32 IST2026-04-21T17:22:02+5:302026-04-21T17:32:46+5:30

‘पक पक पकाक’ मधील साळू आता दिसते भलतीच ग्लॅमरस! फोटो पाहून विश्वासच बसणार नाही

काही चित्रपट अनेक वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. या चित्रपटांमधील कलाकार,संवाद आणि गाणी यांची वर्षानुवर्ष चर्चा होत असते.

असाच एक मराठी चित्रपट म्हणजे 'पक पक पकाक'. अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने बघतात.

गौतम जोगळेकर दिग्दर्शित 'पक पक पकाक' सिनेमात नाना पाटेकरांनी साकारेला भुत्या आजही अनेकांच्या लक्षात आहे. २००५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

भूत्याच्या भूमिकेप्रमाणे चित्रपटातील साळू आणि चिकलूच्या जोडीने देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

‘पक पक पकाक’मधील साळूची भूमिका अभिनेत्री नारायणी शास्त्रीने साकारली होती. सावळा रंग आणि नऊवारी साडीमध्ये असेलली गावाकडची साळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

चित्रपटात आपल्या सौंदर्याने व अभिनयाने भुरळ पाडणारी साळू खऱ्या आयुष्यात फारच सुंदर दिसते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते.

या चित्रपटानंतर नारायणी हिंदी मालिकाविश्वात प्रचंड सक्रिय झाली. तिने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘पिया का घर’ व ‘लाल बनारसी’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

नारायणीने २०१५ मध्ये ब्रिटिश बॉयफ्रेंड स्टिव्हन ग्रेव्हरशी लग्न केलं होतं. मागील अनेक ते वर्षांपासून भारतात राहत आहे.