नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 17:43 IST2026-04-21T17:42:22+5:302026-04-21T17:43:47+5:30
Kailas Gaikwad Bribe Case: महापालिका मुख्यालयात झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४३ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे डॉ. कैलास गायकवाड यांच्या विरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत विभागाने महापालिका मुख्यालयातच सापळा रचला होता. एका कामाच्या बदल्यात ४३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गायकवाड यांना पथकाने ताब्यात घेतले.
ही कारवाई खुद्द नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पार पडली. ४३ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने त्यांना रंगेहाथ पकडले. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा अत्यंत गोपनीयरीत्या रचला होता. अतिक्रमण विभागासारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्यावर ही कारवाई झाल्याने पालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या एसीबीचे पथक पुढील तपास करत असून गायकवाड यांच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.