पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 17:41 IST2026-04-20T17:39:09+5:302026-04-20T17:41:07+5:30

पॅन कार्डचा गैरवापर करून एका डिलिव्हरी बॉयच्या नावावर ९.४९ कोटींची बनावट कंपनी उघडली गेली अन्..

The game of PAN card and the delivery boy's life became hell; Even the police were shocked to see the owner of a company worth 9.5 crores! | पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!

पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!

एका बाजूला दिवसभर पायपीट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा गरीब डिलिव्हरी बॉय आणि दुसऱ्या बाजूला त्याच्याच नावावर असलेला साडेनऊ कोटींचा व्यवसाय! ऐकायला एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटत असली तरी, बिजनौरच्या धामपूर तहसील क्षेत्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. पॅन कार्डचा गैरवापर करून एका डिलिव्हरी बॉयला चक्क करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक बनवण्यात आले आणि आता हा तरुण आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकला आहे.

नोटीस आली अन् पायाखालची जमीन सरकली

धामपूरच्या पृथ्वीपूर बनवारी गावातील रहिवासी फिरोज अहमद हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याचे आयुष्य शांत चालले होते, पण ऑगस्ट २०२५ मध्ये त्याला आयकर विभागाची एक नोटीस मिळाली आणि त्याच्या संसाराची राखरांगोळी झाली. या नोटीसनुसार, फिरोजच्या पॅन कार्डवर 'WYN IMPEX' नावाची कंपनी नोंदणीकृत असून, ऑगस्ट २०२० मध्ये या कंपनीने तब्बल ९.४९ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

ज्या फिरोजने कधी लाखाची रक्कम पाहिली नाही, त्याच्या नावावर ९ कोटींचे व्यवहार झाल्याचे पाहून तो हादरला. चौकशीत असे समोर आले की, १४ जुलै २०२० रोजी त्याच्या पॅन कार्डचा वापर करून या फर्मची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, यात वापरलेला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि कागदपत्रांवरील स्वाक्षरी पूर्णपणे बनावट आहे. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फिरोजच्या पॅन कार्डचा वापर करून हे काळे साम्राज्य उभे केले आहे.

न्यायासाठी वर्षभरापासून वणवण

फिरोज गेल्या वर्षभरापासून आयकर विभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. त्याने स्थानिक पोलीस आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक झा यांच्याकडेही तक्रार केली, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दुसरीकडे, आयकर विभागाकडून वारंवार येणाऱ्या नोटीसमुळे फिरोज प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. "माझ्याकडे ना पैसे आहेत, ना कायदेशीर लढाई लढण्याची ताकद," अशा शब्दांत त्याने आपली व्यथा मांडली आहे.

गरीब आणि कष्टकरी सॉफ्ट टार्गेट?

बिजनौर जिल्ह्यात अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेक शेतकरी आणि मजुरांच्या नावावर बनावट कंपन्या उघडून करोडोंचा टॅक्स चोरी केल्याचे प्रकार समोर आले आहेत. तुमच्या पॅन कार्डचा किंवा आधार कार्डचा वापर कोणी करत नाहीये ना? हे वेळीच तपासणे आता गरजेचे झाले आहे, अन्यथा फिरोजसारखा मनस्ताप कोणालाही सोसावा लागू शकतो.

Web Title : पैन कार्ड धोखाधड़ी से डिलीवरी बॉय का जीवन बर्बाद; करोड़ों की ठगी!

Web Summary : बिजनौर में पैन कार्ड के दुरुपयोग से एक डिलीवरी बॉय 9.5 करोड़ की कंपनी का मालिक बन गया। उसे 'WYN IMPEX' के लिए आयकर नोटिस मिला, जो उसके पैन का उपयोग करके पंजीकृत है। वह तनाव और वित्तीय कठिनाई का सामना करते हुए अपना नाम साफ़ करने के लिए संघर्ष कर रहा है।

Web Title : Delivery boy's life ruined by PAN card fraud; Crores swindled!

Web Summary : A delivery boy in Bijnor became owner of a 9.5 crore company through PAN card misuse. He received an income tax notice for 'WYN IMPEX', registered using his PAN. He's been struggling to clear his name, facing immense stress and financial strain.