GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...

पदार्पणाची पहिली संधी अन् चार चेंडूचा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 19:45 IST2026-04-20T19:39:37+5:302026-04-20T19:45:03+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
GT vs MI Who Is Danish Malewar Nagpur Vidarbha 22-year-old debutant set for big stage For Mumbai Indians vs Gujarat Titans | GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...

GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...

जगातील सर्वात मोठ्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरात टायटन्सविरुद्ध मोठा डाव खेळला आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यासाठीही उपलब्ध नाही. त्याच्या जागी मागील सामन्यात क्विंटन डिकॉकला संधी देण्यात आली होती. आता सलामीवीराच्या नवा प्रयोग आजमावताना रायन रिकल्टनला बाकावर बसतव  मुंबई इंडियन्सच्या संघाने विदर्भकर दानिश मालेवार याला IPL मध्ये पदार्पणाची संधी दिली आहे.  

कोण आहे दानिश मालेवार?

दानिश मालेवार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळतो.  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फर्स्ट क्लास कामगिरीसह खास छाप सोडणाऱ्या उजव्या हाताच्या  फलंदाजाने एकही टी-२० सामना खेळलेला नाही. गुजरात विरुद्ध तो टी-२० कारकिर्दीची सुरुवात करेल.  मिनी लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने २२ वर्षीय विदर्भकरासाठी ३० लाख रुपयांची बोली लावली होती. व्हाईट बॉल क्रिकेटचा अनुभव नसणाऱ्या या फलंदाजाला १५ प्रथम-श्रेणी सामन्यांचा अनुभवाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने त्याला संधी दिली. 

पदार्पणाची पहिली संधी अन् चार चेंडूचा सामना करुन धरला तंबूचा रस्ता

मुंबई इंडियन्सच्या संघाकडून दानिश मालेवार  आपल्या कारकिर्दीतील पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. क्विंटन डी कॉकच्या साथीनं त्याने डावाची सुरुवात केली. पण पदार्पणाच्या सामन्यात त्याला खास छाप सोडता आली नाही.  कगिसो रबाडाने ४ चेंडूत २ धावांवर त्याला तंबूता रस्ता दाखवला. 

मुंबई इंडियन्स  प्लेइंग इलेव्हन 

 दानिश मालेवार, क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (क), टिळक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, क्रिश भगत, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर
 

Web Title : GT vs MI: कौन हैं दानिश मालेवार? मुंबई का बड़ा दांव

Web Summary : रोहित शर्मा की चोट के कारण मुंबई इंडियंस ने दानिश मालेवार को मौका दिया। विदर्भ के खिलाड़ी मालेवार 2 रन बनाकर आउट हो गए। मुंबई का दांव असफल रहा।

Web Title : GT vs MI: Who is Danish Malewar? Mumbai's Risky Play

Web Summary : Mumbai Indians debut Danish Malewar due to Rohit Sharma's injury. Malewar, a Vidarbha player, had a short stint, scoring 2 runs. MI's gamble didn't pay off.