साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 20:00 IST2026-04-20T20:00:09+5:302026-04-20T20:00:22+5:30
Maharashtra IPS Transfer List 2026: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! पुणे, सातारा, सांगलीसह ९ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले असून, हा आदेश २० एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे
पुण्याचे पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची बदली सातारा पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. साताऱ्याचे विद्यमान अधीक्षक तुषार दोशी आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक असतील. सांगलीचे संदिप घुगे यांची नियुक्ती मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस उप महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे निलोत्पल हे कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक असतील. तसेच, एम. रमेश यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची बदली पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागात झाली असून, त्यांच्या जागी धुळ्याचे श्रीकांत ढिवरे यांची जळगावच्या अधीक्षकपदी वर्णी लागली आहे.
| अ.क्र. | अधिकाऱ्याचे नाव | विद्यमान पद | बदलीने पदस्थापना |
| १ | तुषार दोशी | पोलीस अधीक्षक, सातारा | पोलीस अधीक्षक, सांगली
|
| २ | निखिल पिंगळे | पोलीस उप आयुक्त, पुणे | पोलीस अधीक्षक, सातारा
|
| ३ | संदिप घुगे | पोलीस अधीक्षक, सांगली | पोलीस उप आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
|
| ४ | योगेश गुप्ता | पोलीस अधीक्षक, कोल्हापूर | पोलीस उप महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र (प्रभारी)
|
| ५ | निलोत्पल | पोलीस अधीक्षक, गडचिरोली | पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
|
| ६ | एम. रमेश | अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली | पोलीस अधीक्षक, गडचिरोली
|
| ७ | महेश्वर रेड्डी | पोलीस अधीक्षक, जळगाव | पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
|
| ८ | श्रीकांत ढिवरे | पोलीस अधीक्षक, धुळे | पोलीस अधीक्षक, जळगाव
|
| ९ | राजकुमार शिंदे | पोलीस उप आयुक्त, पुणे | पोलीस अधीक्षक, वाशिम
|