...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 21:20 IST2026-04-20T21:20:20+5:302026-04-20T21:20:40+5:30

इराणविरोधातील इस्रायलची लष्करी मोहीम अद्याप संपलेली नाही, असे इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे...

The campaign is not over yet After the White House, now Netanyahu's direct warning | ...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा

...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा


इराण आणि अमेरिका-इस्रायल संघर्षावर काही तोडगा निघतो काय याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. यातच, इराणविरोधातीलइस्रायलची लष्करी मोहीम अद्याप संपलेली नाही, असे इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने मध्यपूर्वेत खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे, अमेरिकेच्या 'व्हाईट हाऊस'नेही सोशल मीडियावर इराणविरोधात अत्यंत कडक भूमिका मांडत, जर इस्लामाबादमधील शांतता चर्चा अपयशी ठरली, तर इराणसोबत पुन्हा मोठे युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

"मोहीम अद्याप संपलेली नाही..." -
इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, इराणविरुद्धची इस्रायलची लष्करी मोहीम अद्याप, संपलेली नाही. त्यांनी म्हटले आहे की, अजून बरेच काम बाकी आहे. यापूर्वी, ११ एप्रिल रोजी जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशात नेतान्याहू यांनी हिब्रू भाषेत म्हटले होते, "आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे. पण हे स्पष्टपणे सांगता येईल की आपण ऐतिहासिक यश मिळवले आहे." याच बरोबर, इराणची आण्विक महत्त्वाकांक्षा आणि क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता, हे मोठे धोके आहे आणि हे धोके इस्रायलला संपवावेच लागतील, असेही नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

नेतन्याहू यांनी दावा केला की, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांनी अणुप्रकल्प जमिनीखाली एवढे खोल लपवण्याचा प्रयत्न केला की, तेथपर्यंत अमेरिकन बी-२ बॉम्बरदेखील पोहोचू शकणार नाहीत. मात्र, इस्रायल गप्प बसू शकत नाही. इराणकडे अद्याप ४०० किलोहून अधिक समृद्ध युरेनियम असून ते राजनैतिक मार्गाने किंवा बळाचा वापर करून हटवले जाईल.

"आता कोणतीही सबब चालणार नाही" -
तत्पूर्वी, अमेरिकन प्रशासनाने 'एक्स' पोस्ट करत इराणला थेट इशारा दिला आहे. "आता कोणतीही सबब चालणार नाही. केवळ विजय मिळवू," अशा आशयाची पोस्ट व्हाईट हाऊसने केली आहे. तसेच 'LOCKED IN MODE: ACTIVATED' असे संदेश पोस्ट करत इराणला इशारा देण्याचाही प्रयत्न केला.

"...तर तेहरानवर मोठा 'सरप्राईज अटॅक' होऊ शकतो" -
या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान चर्चेची नवी फेरी होण्याची शक्यता आहे. मागील चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघाला नव्हता. मात्र, ही चर्चा अयशस्वी ठरल्यास तेहरानवर मोठा 'सरप्राईज अटॅक' होऊ शकतो, अशी भीती इराणनेही व्यक्त केली आहे.

 

Web Title : क्या ईरान पर फिर ड्रोन हमले? नेतन्याहू और व्हाइट हाउस की कड़ी चेतावनी।

Web Summary : नेतन्याहू ने ईरान के खिलाफ इजरायल के सैन्य अभियान के खत्म न होने की चेतावनी दी। व्हाइट हाउस ने शांति वार्ता विफल होने पर संघर्ष की आशंका जताई, तेहरान पर हमले का संकेत दिया।

Web Title : Iran faces renewed drone strikes? Netanyahu, White House issue stark warnings.

Web Summary : Netanyahu warns Israel's military campaign against Iran isn't over amid nuclear concerns. White House signals potential conflict if peace talks fail, hinting at a possible surprise attack on Tehran.