वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:21 IST2026-04-20T13:19:22+5:302026-04-20T13:21:03+5:30
US Navy vs Iran ship MV Tuska: अरबी समुद्रात इराणच्या जहाजावर अमेरिकेचा हल्ला! MK 45 तोफेने इंजिन रूम उडवला; वाचा काय आहे 'यूएसएस स्प्रूएन्स'ची शक्ती.

वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन...
अरबी समुद्रात अमेरिकन नौदलाने १९ एप्रिल रोजी इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकेचा 'गाइडेड मिसाइल डेस्ट्रॉयर' यूएसएस स्प्रूएन्सने इराणच्या 'एमव्ही तूस्का' या जहाजाला अमेरिकन नाकेबंदी तोडल्याबद्दल रोखले. सहा तास ताकीद देऊनही जहाज न थांबल्याने, अमेरिकेने आपल्या MK 45 या तोफेने जहाजाच्या इंजिन रूमवर थेट हल्ला केला आणि जहाज आपल्या ताब्यात घेतले.
कारवाईचा थरार: नेमकं काय घडलं?
इशाऱ्याकडे दुर्लक्ष: 'एमव्ही तूस्का' हे २७ किमी प्रतितास वेगाने इराणच्या 'बंदर अब्बास' बंदराकडे जात होते. अमेरिकन सैन्याने अनेकदा इशारे दिले, मात्र जहाजावरील कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
अचूक नेम: स्प्रूएन्सने प्रथम जहाजाचा इंजिन रूम रिकामा करण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर आपल्या ५-इंच MK 45 गनमधून अनेक राऊंड फायर केले. यामुळे जहाजाची गती थांबली.
ताबा: इंजिन निकामी होताच, अमेरिकेच्या ३१ व्या मरीन एक्स्पेडिशनरी युनिटच्या मरीन सैनिकांनी जहाजावर बोर्डिंग केले आणि ते आपल्या ताब्यात घेतले.
MK 45 गन: ज्यामुळे ही कारवाई ठरली यशस्वी
MK 45 ही अमेरिकन नौदलाची अत्यंत विश्वासार्ह आणि आधुनिक तोफ आहे. या कारवाईत तिने आपल्या अचूकतेची चुणूक दाखवून दिली.
काय आहे वैशिष्ठ्य?
ही ५-इंच (१२७ मिमी) कॅलिबरची तोफ पूर्णपणे स्वयंचलित आहे. तोफेच्या ठिकाणी कोणताही माणूस नसतो, तर खालील डेकवरून ६ लोकांची टीम रिमोटद्वारे ती चालवते. या तोफेने 'तूस्का'च्या इंजिन रूमला इतका अचूक निशाणा लावला की, जहाजाला मोठी आग लागली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. केवळ त्याचे इंजिन निकामी झाले. ही तोफ प्रति मिनिट १६ ते २० गोळे डागू शकते. साध्या गोळ्याने ती २४ किमी दूरपर्यंत मार करू शकते. तिचे एकूण वजन सुमारे २२ टन आहे.