इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:25 IST2026-04-22T17:22:51+5:302026-04-22T17:25:33+5:30
Iran Execution Mossad Spy: इस्रायलची गुप्तहेर संघटना असलेल्या मोसादच्या एका एजंटला इराणने फाशी दिली.

इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
इराणच्या संरक्षण समितीच्या व्यवस्थापन विभागात कार्यरत असलेला एका व्यक्तीला फाशी देण्यात आली. मेहदी फरीद असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने इराणबद्दलची गोपनीय आणि संवदेनशील माहिती इस्रायलच्या गुप्तचर संघटनेला दिल्या प्रकरणी तो दोषी ठरला होता.
इराणच्या न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, मेहदी फरीद या व्यक्तीने देशाची अतिशय संवेदनशील, गोपनीय माहिती इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला दिली होती.
गुप्तहेर कोणत्या विभागात करत होता काम?
मेहदी फरीद हा पॅसिव्ह डिफेन्स कमिटीच्या व्यवस्थापन विभागात कामाला होता. ही कमिटी देशाची महत्त्वाची आहे कमिटी आहे. त्याने इंटरनेटच्या माध्यमातून इस्रायलशी संपर्क केला आणि फरीदची निवड मोसाद केली, अशी माहिती न्यायालयाकडून देण्यात आली.
फाशी देण्याच्या संख्येत वाढ
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून फाशी देण्याची संख्या वाढली असून, यावर जगभरातील मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारे खटले चालवणे आणि फाशीची शिक्षा देणे, मानवाधिकारांचे उल्लंघन आहे, असे या संघटनांनी म्हटले आहे.
इराणमध्ये जानेवारी महिन्यात मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनात काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील काही लोकांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
आठ महिलांना फाशीची शिक्षा देणार?
दरम्यान, याच आंदोलनात सहभागी झालेल्या आठ महिलांना कैद करण्यात आले असून, त्यांना फाशीची शिक्षा देणार असल्याची एक पोस्ट समोर आली. त्यावर या महिलांना इराणने कोणतीही हानी पोहोचवू नये, त्यांना सोडून देण्यात यावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.