सनरायझर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीतून सावरून आयपीएलच्या मैदानात उतरण्यास सज्ज आहे. ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज २५ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून हैदराबादच्या आगामी सामन्यासाठी सज्ज असेल. त्याच्या कमबॅकमुळे सनरायझर्स हैदराबादची गोलंदाजीतील ताकद वाढेल, यात शंका नाही. पण तो परतल्यावरही काव्या मारन हिने ‘फॉरेन’चे प्रेम विसरून शानदार कॅप्टन्सी करत असलेल्या ईशान किशनवरच भरवसा दाखवावा, अशा आशयाचे वक्तव्य माजी क्रिकेटरने केले आहे. खरंच ती हा सल्ला मनावर घेणार का? हा आयपीएलमधील एक नवा चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काव्या मारनची कॅप्टन्सीची चॉईसची खासियत
IPL मध्ये सनरायझर्स हैदराबादची संघ मालकीण काव्या मारन ही संघाच्या निर्णयामध्ये चांगलीच सक्रीय असल्याचे दिसून येते. लिलावापासून ते अगदी संघाच्या सामन्यावेळी ती स्टेडियम स्टँडमधील आपल्या उपस्थितीतनं सर्वांचे लक्षवेधून घेताना दिसते. एवढेच नाही तर तिची कॅप्टन्सी चॉईस ही परदेशी खेळाडू राहिली आहे. यात SRH च्या संघाला पहिले जतेपद मिळवून देण्यात डेविड वॉर्नरसह केन विल्यमसन आणि यंदाच्या हंगामात पॅट कमिन्सवर टाकलेली जबाबदारी ही त्याची काही उदाहरणे आहेत. पॅट कमिन्स दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांना मुकल्यामुळे SRH च्या संघाचे नेतृत्व भारतीय स्टार ईशान किशनच्या खांद्यावर आले. त्यानेही आपल्या कॅप्टन्सीची झलक दाखवून दिली आहे. पॅट कमिन्स परतल्यावरही SRH च्या संघाने ईशान किशनकडे नेतृत्वताची जबाबदारी कायम ठेवावी, असे मत संजय बांगर यांनी मांडले आहे.
तो आला तरी ईशान किशनकडेच नेतृत्व कायम ठेवावे
जिओ स़्टारच्या खास शोमध्ये ते म्हणाले की, “एकंदरीत, माझा विश्वास आहे की. पॅट कमिन्स परत आला तरी, ईशान किशनने सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद कायम ठेवावे. बहुतेक वेळा, भारतीय कर्णधार असण्यामुळे संघात सातत्य येते. पॅट कमिन्ससारखा गोलंदाज ज्या किरकोळ दुखापतींशी झुंज देत आहे, ते पाहता आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यात किती तंदुरुस्त राहील याची खात्री देता येत नाही. ईशानने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळल्यास खेळाडूंना खूप सातत्य मिळते. हैदराबादसाठी हाच योग्य मार्ग असेल.”
काव्या मारनचा संघ माजी दिग्गजाला फॉलो करणार, की ...
सनराय़झर्स हैदराबादच्या संघाने यंदाच्या हंगामातील पहिल्या सात सामन्यात ईशान किशनच्या नेकृत्वाखाली ४ सामने जिंकले आहेत. जवळपास साखळी फेरीतील निममे सामने खेळल्यावर संघ गुणतालिकेत अव्वल ३ मध्ये आहे. त्यामुळेच ईशान किशनचे नेतृत्व कायम ठेवणं हीच शानदार चाल ठरेल. आता काव्या मारन फॉरेनचं प्रेम विसरुन त्या जागी सेट केलेली फ्रेम कायम ठेवणार की, पॅट कमिन्सकडे धुरा देणार? ते पाहण्याजोगे असेल.