'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:40 IST2026-04-22T17:39:19+5:302026-04-22T17:40:49+5:30
इतिहासाची मोडतोड केली? भाजप कार्यकर्त्याच्या आरोपावर रितेशचं उत्तर

'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
रितेश देशमुख सध्या 'राजा शिवाजी' या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमा बनवायचा हे रितेशचं स्वप्न होतं जे आता सत्यात उतरत आहे. सिनेमातील 'छत्रपती' हे अजय-अतुलचं गाणं तुफान गाजतंय. तसंच सिनेमाच्या टीझरमध्ये अनेक तगड्या कलाकारांची फौज दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर सिनेमाच्या ट्रेलरमधील एका सीनवरुन वाद सुरु झाला आहे ज्यावर रितेशने थेट उत्तरही दिलं आहे.
काय आहे वाद?
'राजा शिवाजी'च्या ट्रेलरमध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा तो सीन आहे. अफजल खान महाराजांची गळाभेट घेतो आणि तेव्हाच त्यांना मारण्याचा त्याचा प्लॅन असतो. तेवढ्यात शिवाजी महाराज अफजल खानाच्या पोटावर वाघनखं खूपसून त्याचा कोथळाच बाहेर काढतात. 'राजा शिवाजी'च्या सीनमध्ये मात्र रितेश देशमुख गळाभेट घेण्याआधीच संजय दत्तला वाघनखं दाखवताना दिसतो. हा चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते सुरेश नखुआ यांनी केला. त्यांनी ट्वीट करत लिहिले, "रितेश देशमुखच्या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती ळिवाजी महाराज अफजल खानाने वार करण्याआधीच त्याला वाघनखं दाखवत आहेत. मात्र इतिहासात असं नमूद आहे की अफजल खानाने वार केल्यानंतरच महाराजांनी वाघनखांचा वापर केला आहे.रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा इतिहास, वारसा आणि अस्मितेची मोडतोड व अपमान का करत आहे?"
The trailer of Riteish Deshmukh’s film shows Chhatrapati Shivaji Maharaj openly displaying the Wagh Nakh to Afzal Khan before the attack.
— Suresh Nakhua 🇮🇳 (@SureshNakhua) April 22, 2026
It is historical fact that "Wagh Nakh" was concealed and Chhatrapati Shivaji Maharaj used it only after attack by Afzal.
WHY IS @RITEISHD… https://t.co/u3yls4ojPfpic.twitter.com/CWvAgKagmB
नखुआ यांचं ट्वीट रिपोस्ट करत रितेश देशमुखने उत्तर दिलं आहे. तो लिहितो, "आदरणीय सर, कृपया १ मे रोजी सिनेमा बघा तुम्हाला याचं उत्तर सिनेमातच मिळेल. तुम्हाला आणि तुमच्या मित्रपरिवाराला सिनेमा आवडेल अशी आशा करतो. जय शिवराय."
Respected Sir, pls do watch the film on 1st May.. the answer to your question is there in the movie. I hope you enjoy the film with your friends and family. Jai Shivrai 🙏🏽 https://t.co/RyzDUnpl4x
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 22, 2026
'राजा शिवाजी' १ मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रितेशला छत्रपतींच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. अजय अतुलचं संगीत मोठ्या पडद्यावर अनुभवण्याचीही संधी यातून मिळणार आहे. जिनिलिया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, भाग्यश्री, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर यांचीही सिनेमात भूमिका आहे.