टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार

जागतिक क्रिकेटमध्ये दोन गोलंदाजांनी, या फास्ट क्रिकेट प्रकारात एक असा पराक्रम केला आहे, ज्याची केवळ बरोबरीच होऊ शकते, मात्र तो मोडणे अशक्य आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 18:59 IST2026-04-22T18:58:49+5:302026-04-22T18:59:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
four-maiden-overs-in-a-match This record can only be equalled in T20 Internationals; impossible to break! Only 2 bowlers have achieved this amazing miracle | टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार

टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार

क्रिकेटमध्ये काळानुसार अनेक बदल होत गेले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर आता टी-२० क्रिकेटची चलती आहे. या 'फास्ट' क्रिकेटमध्ये फलंदाज सहजपणे २५० पेक्षा अधिक धावांचे डोंगर उभारतात. अशा स्थितीत गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. मात्र, जागतिक क्रिकेटमध्ये दोन गोलंदाजांनी, या फास्ट क्रिकेट प्रकारात एक असा पराक्रम केला आहे, ज्याची केवळ बरोबरीच होऊ शकते, मात्र तो मोडणे अशक्य आहे.

४ 'मेडन' ओव्हर्सचा पराक्रम! -
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होऊन २१ वर्षे झाली आहेत. मात्र या २१ वर्षांच्या प्रदीर्घ काळात केवळ दोनच गोलंदाज असे आहेत, ज्यांना एका सामन्यात आपले संपूर्ण चार ओव्हर्स 'मेडन' (एकही धाव न देता) टाकण्याचा पराक्रम करता आला आहे. यांत पहिला खेळाडू आहे कॅनडाचा फिरकीपटू साद बिन जफर. त्याने २०२१ मध्ये पनामाविरुद्धच्या सामन्यात ४ ओव्हर्समध्ये शून्य धावा देत २ बळी मिळवले होते.

लॉकी फर्ग्युसनचा विश्वचषकातील ऐतिहासिक स्पेल -
२०२४ च्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडचा प्रवास निराशाजनक ठरला होता. मात्र, त्यांचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने इतिहास रचला. पापुआ न्यू गिनी (PNG) विरुद्धच्या सामन्यात फर्ग्युसनने आपल्या कोट्यातील चारही ओव्हर्स मेडन टाकले. एवढेच नाही तर त्याने ३ बळीही मिळवले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये असा पराक्रम करणारा तो जगातील दुसरा, तर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात असा चमत्कार करणारा तो पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला. फलंदाजांच्या वर्चस्वाच्या या युगात ४ ओव्हर्समध्ये एकही धाव न देणे, हा एक मोठा विक्रम म्हणावा लागेल.

Web Title: four-maiden-overs-in-a-match This record can only be equalled in T20 Internationals; impossible to break! Only 2 bowlers have achieved this amazing miracle