IPL 2026 LSG vs RR Mohammed Shami Two Ball Two Wickets : लखनौच्या इकाना मैदानातील राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीनं आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पॉवर प्लेमध्ये सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला पंतकरवी झेलबाद करत LSG च्या संघाला पहिले यश मिळवून दिले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ध्रुव जुरेल यालाही शमीनं आल्या पावली माघारी धाडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
LSG संघ मालक संजीव गोएंका यांनी लगेच काढला फोटो
शमीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिल्यावर स्टेडियम स्टँडवर उपस्थितीत LSG संघ मालक संजीव गोएंकांची खास झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. त्यांनी आपल्या खिशातील तिरुपती बालाजीचा फोटो काढत आपल्या माथी लावून देवाचे आभार व्यक्त करत बॅक टू बॅक विकेट्सचा आनंद साजरा केला.
ओल्ड इज गोल्ड! IPL मधील धमाकेदार कामगिरीसह ‘या’ ५ धुरंधरांनी ठोठावला Team India चा दरवाजा
शमीचा जलवा! दोन चेंडूत दोन विकेट्स घेत पॉवर प्लेमध्येच RR च्या फलंदाजीतील काढली हवा
नाणेफेक गमावल्यावर यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या जोडीनं राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात केली. IPL च्या यंदाच्या हंगामातील ही हिट जोडी आहे. पण लखनौविरुद्ध त्यांचा रुबाब चालला नाही. शमीनं आपल्या दुसऱ्या आणि RR च्या डावातील तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर यशस्वी जैस्वालच्या खेळीला ब्रेक लावला. विकेटमागे रिषभ पंतने त्याचा सर्वोत्तम झेल टिपला. यशस्वीनं १२ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने २२ धावांची खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या ध्रुव जुरेलला शमीनं पंतकरवी झेल बाद करत आल्या पावली माघारी धाडले.