इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 21:52 IST2026-04-22T21:51:26+5:302026-04-22T21:52:43+5:30

Vortexa या रिअल-टाइम डेटा देणाऱ्या संस्थेनुसार, हे जहाज १७ एप्रिल रोजी इराणी जलक्षेत्रातून बाहेर पडले. याशिवाय, २० एप्रिलला आणखी दोन टँकर्स तेथून बाहेर पडले. यावर आता अमेरिका अथवा डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया येते हे बघण्यासारखे असेल.

Iran breaks US blockade, takes 34 tankers under its nose; Oil worth $900 million passes through Hormuz | इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा

इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकन नौदलाचे संंपूर्ण नियंत्रण असल्याचा दावा करत आहेत. मात्र तरीही इराणने ही नाकाबंदी मोडीत काढली असून सुमारे ३४ टँकर्स अमेरिकन नौदलाला चकमा देत अक्षरशः त्यांच्या नाकाखालून होर्मुझ बाहेर काढली आहेत. अर्थात इराणची जहाजे होर्मुझ पार करण्यात यशस्वी झाली आहेत.

९१० मिलियन डॉलरचं तेल 'होर्मुज'बाहेर...!
यासंदर्भात 'फायनान्शिअल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, नाकाबंदी तोडणाऱ्या ३४ जहाजांपैकी १९ टँकर्स खाडीतून बाहेर पडले आहेत, तर १५ जहाजांनी अरबी समुद्रातून खाडीत प्रवेश केला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडलेल्या जहाजांपैकी ६ जहाजे इराणचे कच्चे तेल वाहून नेत असल्याची पुष्टी झाली आहे. त्यात सुमारे १०.७ दशलक्ष बॅरल तेल होते. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे इराणचे तेल बाजारभावापेक्षा १० डॉलर प्रति बॅरल स्वस्त विकले जाते. या हिशोबात या शिपमेंटमधून इराणला सुमारे ९१० मिलियन डॉलरचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

अशी तोडली नाकाबंदी -
अमेरिकेने गेल्या १३ एप्रिल रोजी होर्मुझमध्ये ही नाकाबंदी केली आहे. इराणने हा अडथळा पार करण्यासाठी खास युक्ती लढवली आणि एका विशेष तंत्राचा वापर केला. 'डोरेना' (Dorena) नावाच्या इराणी सुपरटँकरने आपले 'ट्रान्सपॉन्डर' (जहाजाची स्थिती दर्शवणारे उपकरण) बंद केले. यामुळे त्याची ओळख पटवणे कठीण झाले. 

Vortexa या रिअल-टाइम डेटा देणाऱ्या संस्थेनुसार, हे जहाज १७ एप्रिल रोजी इराणी जलक्षेत्रातून बाहेर पडले. याशिवाय, २० एप्रिलला आणखी दोन टँकर्स तेथून बाहेर पडले. यावर आता अमेरिका अथवा डोनाल्ड ट्रम्प यांची काय प्रतिक्रिया येते हे बघण्यासारखे असेल.

Web Title: Iran breaks US blockade, takes 34 tankers under its nose; Oil worth $900 million passes through Hormuz