प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 21:20 IST2026-04-22T21:19:43+5:302026-04-22T21:20:18+5:30

प्रियकरासोबत पाहिल्याच्या रागातून वडिलांनी १७ वर्षीय मुलीची गळा आवळून केली हत्या.

Boyfriend left daughter's room; Angry father kills 17-year-old daughter | प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले

प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याची कुणकूण लागल्याने संतापलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीची गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. नगीना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिन्जाहेडी गावात घडलेल्या या 'ऑनर किलिंग'च्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

नजाकत असे या आरोपी वडिलांचे नाव असून, तो एका बेकरीमध्ये कामाला आहे. त्याला एकूण सहा अपत्ये असून, त्यातील मृत मुलगी रेश्मा (वय १७) ही सर्वात मोठी होती. रेश्माचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, ज्याचा घरच्यांचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होता. कुटुंबीयांनी तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती.

मध्यरात्री केला घात

बुधवारी पहाटेच्या सुमारास नजाकतने आपल्या मुलीच्या प्रियकराला घराबाहेर पडताना पाहिले. यामुळे त्याचा राग अनावर झाला. मुलगी गाढ झोपेत असताना, पहाटे ४ वाजताच्या सुमारास नजाकतने तिचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नजाकतच्या घरातील एका खोलीत मुलीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांसमोर गुन्हा कबूल

सुरुवातीला काहीही बोलण्यास टाळाटाळ करणाऱ्या नजाकतने पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला. "मी एका मुलाला रात्री घरून बाहेर पडताना पाहिले, त्यामुळे मला प्रचंड राग आला आणि मी तिची हत्या केली," अशी कबुली त्याने दिली आहे. बिजनौरचे पोलीस क्षेत्राधिकारी राजेश कुमार सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. एका प्रेमसंबंधावरून बापानेच मुलीचा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title : प्रेम संबंध के चलते पिता ने बेटी को मारा; ऑनर किलिंग।

Web Summary : उत्तर प्रदेश के बिजनौर में एक पिता ने प्रेम संबंध के चलते अपनी 17 वर्षीय बेटी की गला घोंटकर हत्या कर दी। पुलिस ने आरोपी पिता को गिरफ्तार कर लिया है, जिसने अपना अपराध कबूल कर लिया है। इस घटना से क्षेत्र में आक्रोश है।

Web Title : Father kills daughter for having affair; honor killing reported.

Web Summary : In Uttar Pradesh's Bijnor, a father murdered his 17-year-old daughter after discovering her love affair. Enraged, he strangled her. Police arrested the father, who confessed to the crime, sparking outrage.