उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 22:02 IST2026-04-22T22:01:04+5:302026-04-22T22:02:12+5:30

पुण्यात कडक उन्हाच्या तडाख्यानंतर पावसाची हजेरी. स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात पावसाच्या मध्यम सरी.

Sudden rains in Pune due to heatwave; Moderate showers in Swargate, Shastri Road areas | उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी

उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी

गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना बुधवारी सायंकाळी पावसाने मोठा दिलासा दिला. दिवसभर अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेनंतर, अचानक झालेल्या पावसाच्या सरींनी वातावरणात काहीसा गारवा निर्माण केला आहे.

अचानक बदलले हवामान

बुधवारी सकाळपासूनच पुण्यात सूर्य आग ओकत होता. घामाच्या धारा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सायंकाळी ४ च्या सुमारास वातावरणात अचानक नाट्यमय बदल झाला. आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले आणि काही वेळातच पावसाने हजेरी लावली. स्वारगेट, सारसबाग, शास्त्री रोड, दांडेकर पूल आणि मध्यवर्ती पेठांमधील काही भागात पावसाच्या मध्यम सरी बरसल्या.

नागरिकांची धावपळ

पावसाचे प्रमाण तसे तुरळक होते, तरीही अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. नोकरदार वर्ग आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित आश्रय शोधण्यासाठी कसरत करावी लागली. पावसामुळे रस्ते ओले झाल्याने दुचाकीस्वारांनाही जपून वाहन चालवावे लागले.

दिवसभराच्या उष्णतेनंतर बरसलेल्या या पावसाने हवेत काहीसा ओलावा आणि गारवा निर्माण केला असला, तरी पुढील काही दिवस हवामान कसे राहील, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Web Title : पुणे में भीषण गर्मी से राहत, अचानक बारिश की बौछार

Web Summary : पुणे में भीषण गर्मी के बाद अचानक बारिश से लोगों को राहत मिली। स्वाargate और शास्त्री रोड इलाकों में बारिश हुई, जिससे तापमान में गिरावट आई और लोगों ने गर्मी से राहत महसूस की।

Web Title : Sudden Rain Showers in Pune Bring Relief from Scorching Heat

Web Summary : Pune residents got relief from heat as sudden rain showers hit Swargate, Shastri Road areas. The downpour brought respite after a day of intense heat, with citizens rushing for cover as the weather shifted dramatically.