रिषभ पंतच्या लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने घरच्या मैदानातील सामन्यात उत्तम गोलंदाजी करत तगड्या फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला १५९ धावांवर रोखले. पण या धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्लेमध्ये लखनौच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. अवघ्या ११ चेंडूत ३ विकेट्स गमावल्यामुळे सोपे वाटणारे आव्हान लखनौ सुपर जाएंट्सने अधिक आव्हानात्मक करून घेतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या षटकात ९ धावा काढल्यावर गिफ्ट स्वरुपात दिली विकेट
मिचेल मार्श आणि आयुष बडोनी जोडीनं लखनौच्या डावाची सुरुवात केली. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर दोन चौकारासह एकेरी धाव घेत पहिल्या पाच चेंडूत मिचेल मार्शन ९ धावा घेतल्या. चांगली सुरुवात मिळाली असताना आयुष बडोनी याने एक चोरटी धाव घेण्याच्या नादात धावबादच्या रुपात आपली विकेट फेकली. जोफ्रानं जवळपास १४७ किमी प्रतितास वेगाने टाकलेला चेंडू आयुष बडोनीच्या पॅडवर लागून चेंडू स्केअर लेगच्या दिशेनं गेला. यावेळी आयुष बडोनी एक धाव घेण्यासाठी मैदान सोडले. पण मिचेल मार्शनं धाव घेण्यास नकार दिला. दोघांच्यातील ताळमेळाच्या अभावाचा फायदा उठवत रवी सिंगनं बडोनीच्या रुपात संघाला पहिली विकेट मिळवून दिली.
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
पुढच्या २ षटकांत २ धावांत २ विकेट्स! पंतसह मार्करमच्या पदरीही भोपळा
पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर मैदानात उतरेला रिषभ पंत खातेही न उघडता माघारी फिरला. डावातील दुसऱ्या षटकात नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर दोन निर्धाव चेंडू खेळल्यावर चौथ्या चेंडूवर पंतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव फसला अन ध्रुव जुरेलनं त्याचा झेल टिपला. तिसऱ्या षटकातही LSG नं तिसरी विकेट गमावली. जोफ्रा आर्चरनं एडन मार्कमला खातेही उघडू न देता माघारी धाडले.
गोलंदाजी भारी, पण फलंदाजीमुळे गणित बिघडलं
लखनौ सुपर जाएंट्सचा संघ यंदाच्या हंगामात गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करत आहे. पण आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या फ्लॉपशोमुळे ते सातत्याने अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. इकानाच्या घरच्या मैदानात पुन्हा एकदा आघाडीच्या फलंदाजांमुळे संघ अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले.