कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:05 IST2026-04-22T13:05:20+5:302026-04-22T13:05:53+5:30

US woman assault Karnataka homestay: कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यात अमेरिकन महिला पर्यटकावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

US woman assault Karnataka homestay: American woman raped in homestay in Karnataka; Owner turned off WiFi for three days, employee also arrested | कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक

कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक

कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातील कुट्टा गावातील एका होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेला शीतपेयातून नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर दुष्कर्म करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी वृजेश कुमार आणि होमस्टेच्या मालकाला अटक करून ३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

वृजेश कुमार हा मूळचा झारखंडचा असून तो या होमस्टेमध्ये कामाला होता. त्याने महिलेला नशेचा पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. होमस्टे मालकावर ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने कोणाशीही संपर्क साधू नये, यासाठी मालकाने सलग तीन दिवस होमस्टेचे वाय-फाय कनेक्शन बंद करून ठेवले होते.

महिलेची सुटका
वाय-फाय सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर, महिलेने म्हैसूरला जाण्याचे निमित्त करून तिथून पळ काढला. त्यानंतर तिने अमेरिकन दूतावासाशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली.

अमेरिकन दूतावासाची मध्यस्थी
अमेरिकन दूतावासाने ईमेलद्वारे म्हैसूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कारवाई करत कोडगू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोडगूच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : कर्नाटक: होमस्टे में अमेरिकी महिला से दुष्कर्म, मालिक, कर्मचारी गिरफ्तार

Web Summary : कर्नाटक के एक होमस्टे में अमेरिकी महिला से दुष्कर्म किया गया। आरोप है कि महिला को नशीला पदार्थ दिया गया था। मालिक ने संपर्क रोकने के लिए वाई-फाई बंद कर दिया। अमेरिकी दूतावास के हस्तक्षेप के बाद मालिक और कर्मचारी दोनों गिरफ्तार।

Web Title : American woman assaulted in Karnataka homestay; owner, employee arrested.

Web Summary : An American woman was sexually assaulted in a Karnataka homestay after being drugged. The owner allegedly disabled Wi-Fi for three days to prevent her from contacting anyone. Both the owner and the employee involved have been arrested following intervention by the American embassy.