Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:55 IST2026-04-22T10:55:51+5:302026-04-22T10:55:51+5:30
Ashok Kharat : नाशिक भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात अत्यंत महत्त्वाची घडामोड मंगळवारी घडली. एसआयटीकडून शहरातील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची प्रदीर्घ चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
नाशिक भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात अत्यंत महत्त्वाची घडामोड मंगळवारी घडली. एसआयटीकडून शहरातील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची प्रदीर्घ चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित व्यावसायिक आणि खरात यांच्यातील जमीन व्यवहार तसेच अन्य बाबींचीही विचारपूस यावेळी करण्यात आली. शहरात मध्यंतरी वादग्रस्त ठरलेल्या आणि 'गोल्डन गँग' म्हणून चर्चेत असणाऱ्या कंपूमध्ये या हॉटेल व्यावसायिकाचा बोलबाला होता.
अगोदरपासून संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या या व्यावसायिकाची खरात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी तीन ते नऊ अशी तब्बल सहा तास चौकशी आल्याचे सांगण्यात करण्यात येते. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
खरात याची राजकीय, सामाजिक क्षेत्रासह अनेक व्यवसायिकांशी जवळीक आहे. या व्यावसायिकांसोबत खरातने आर्थिक व्यवहार केल्याचा दाट संशय एसआयटीला आहे. खरातप्रकरणात संबंधित हॉटेल व्यावसायिक जमिनीच्या काही व्यवहारांमध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत होता. खरात आणि संबंधित हॉटेल व्यवसायिकात किती कॉल झाले. कोणत्या विषयावर बोलणे झाले याची माहिती चौकशीत गोळा करण्यात आली.
"...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
प्राप्त माहितीनुसार पाथर्डी तरं मखमलाबाद येथील मोठ्या जमीन व्यवहाराशी संबंधित बाबींची चौकशी झाल्याचे कळते. चौकशीसाठी त्यांची गरज पडल्यास पुन्हा बोलवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्यंतरी याच हॉटेल व्यावसायिका संबंधित प्रकरण बरेच गाजले होते. त्यामुळे त्याच प्रकरणात त्याची चौकशी झाली का? अशी चर्चा होती. पण खरातसोबत आर्थिक संबंधावरून चौकशी झाल्याची माहिती मिळते.
'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
कार्डियाक अॅम्ब्युलन्समध्ये खरातची वैद्यकीय तपासणी
भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडल्याने त्याची एसआयटीच्या पोलीस कोठडीतच तातडीची वैद्यकीय तपासणी मंगळवारी दुपारी करण्यात आली. यासाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स मागविण्यात आली होती. सोबत वैद्यकीय पथक देखील होते. छातीत दुखत असल्याचे तसेच डोके सतत दुखत असल्याची तक्रार खरातने केली होती. त्या अनुशंगाने खरातचा इसीजी करण्यात आला. यात काय रिपोर्ट आला ही माहिती मिळू शकली नाही. सोबतच ऑक्सिजन लेव्हल तसेच बीपी देखील तपासण्यात आला.
औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
जवळपास दोन तास खरात कार्डियाक अॅम्ब्युलन्समध्येच होता. डॉक्टरांनी गोळ्या, औषधे लिहून दिल्यावर एसआयटीच्या पथकाने ते मागवून घेतले. दोन दिवसापूर्वीच खरातच्या वकिलांनी खरात याचे डोके सतत दुखत असून औषधी घेऊन उपयोग होत नसल्याने मेंदू विकार तज्ज्ञांकडे खरातला घेऊन जाण्याची परवानगी मागितली होती, तेव्हा न्यायाधीशांनी याविषयी एसआयटीने उचित कारवाई करावी, असे निर्देश दिले.