ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:30 IST2026-04-22T12:29:35+5:302026-04-22T12:30:38+5:30

दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.

two arrested by delhi police in massive online shoping iphone fraud case | ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक

ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. दिल्लीपोलिसांनी एका मोठ्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. महागडे मोबाईल ऑर्डर करून ते डिलिव्हर झाल्याचे भासवायचे, पण प्रत्यक्षात ते स्वतःकडेच ठेवून घ्यायचे, अशी या गुन्ह्याची धक्कादायक पद्धत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगम पार्क पोलीस चौकी आणि भारत नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करत जसप्रीत सिंह आणि हिमांशु या दोघांना अटक केली आहे.

हे दोन्ही आरोपी किशनगंज परिसरातील रहिवासी असून त्यांनी पहिल्यांदाच असा गुन्हा केल्याचं समोर आलं आहे. शास्त्री नगर येथील रहिवासी सुमित अग्रवाल यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांनी १२ ते १६ एप्रिल दरम्यान ॲमेझॉनवरून 'आयफोन १६' मॉडेलचे एकूण ५० फोन ऑर्डर केले होते. ॲपवर हे सर्व फोन डिलिव्हर झाल्याचे दाखवण्यात आले, परंतु सुमित यांच्यापर्यंत एकही फोन पोहोचला नाही. अशा प्रकारे त्यांची सुमारे ३५ लाख रुपयांची फसवणूक झाली.

तपासादरम्यान दिल्ली पोलिसांनी जीटी करनाल रोडवरील ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या कार्यालयातून माहिती गोळा केली. तेव्हा असे लक्षात आले की, बहुतेक पार्सल 'जसप्रीत' नावाच्या एकाच डिलिव्हरी एजंटला देण्यात आले होते. संशयावरून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपला साथीदार हिमांशुसोबत मिळून हा घोटाळा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी हिमांशुलाही अटक केली.

पोलिसांनी या दोघांच्या माहितीवरून १० लाख रुपये किमतीचे १४ आयफोन १६ जप्त केले आहेत. उर्वरित फोनचा शोध सध्या सुरू आहे. लवकर पैसे कमावण्याच्या लोभापोटी आपण हे कृत्य केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. पोलीस आता इतर फोन हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असून या आरोपींनी असे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास करत आहेत.

Web Title : दिल्ली: ऑनलाइन आईफोन ऑर्डर में 35 लाख रुपये की धोखाधड़ी, दो गिरफ्तार।

Web Summary : दिल्ली पुलिस ने 35 लाख रुपये के आईफोन घोटाले का भंडाफोड़ किया, दो गिरफ्तार। अमेज़ॅन के माध्यम से 50 आईफोन का ऑर्डर दिया गया, लेकिन कोई डिलीवरी नहीं हुई। डिलीवरी एजेंट ने एक साथी के साथ धोखाधड़ी कबूल की। 14 आईफोन बरामद।

Web Title : Delhi: Online iPhone order scam worth ₹35 lakhs busted, two arrested.

Web Summary : Delhi police busted a ₹35 lakh iPhone scam, arresting two. Victim ordered 50 iPhones via Amazon, but none were delivered. Delivery agent confessed to the fraud with an accomplice. 14 iPhones recovered.