गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:50 IST2026-04-22T13:49:05+5:302026-04-22T13:50:58+5:30

Guruwari Gurupushyamrut Yoga 2026 Swami Seva: गुरुवारी अतिशय शुभ असा गुरुपुष्यामृत योग जुळून आल्याने या दिवशी आवर्जून स्वामी सेवा करावी, असे म्हटले जाते.

guruwari gurupushyamrut yoga april 2026 should do special shree swami samarth maharaj seva your wishes to be fulfilled and inauspiciousness removed | गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!

गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!

Guruwari Gurupushyamrut Yoga 2026: गुरुवार, २३ एप्रिल २०२६ रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. रात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटांपासून ते पहाटे ०६ वाजून १७ मिनिटांपर्यंत असणार आहे. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन, स्वामींच्या मंत्रांचे जप, नामस्मरण केले जाते. हजारो भाविक स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतात. गुरुवारी अतिशय शुभ असा गुरुपुष्यामृत योग जुळून आल्याने या दिवशी आवर्जून स्वामी सेवा करावी, असे म्हटले जाते. 

श्री स्वामी समर्थ या नावाचा केवळ उच्चार केला, तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. सकारात्मकता मिळते. वेगळीच ऊर्जा संचारते. प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. 

मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!

यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात. याच शुभ दिनी स्वामींची सेवा केल्यास पुण्य फल, लाभ प्राप्त होऊ शकतील, इच्छा पूर्ण होऊ शकतील, स्वामी अशक्यही शक्य करतील, असा विश्वास अवश्य ठेवावा, असे म्हटले जात आहे. 

आवर्जून स्वामी सेवा करा

स्वामींची कृपा लाभावी, यासाठी प्रत्येक जण विशेष प्रयत्न करत असतो. सूर्य किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही, असे अनेक जण सांगतात. 

- शक्य असेल तर आवर्जून स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे.

- स्वामींचे विशेष पूजन, नामस्मरण, मंत्रांचे जप करावेत. 

- पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई, स्वामींच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात. 

- गुरुवारी आपली नित्याची सेवा सुरूच ठेवावी.

- स्वामींच्या प्रभावी तारक मंत्र म्हणावा. शक्य असेल तर ११ वेळा, २१ वेळा पारायण करावे.

- स्वामी नक्कीच शुभ करतील, अशी अढळ श्रद्धा कायम ठेवा. स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. 

- स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण, स्वामी सेवा करत राहा. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

Web Title : गुरुवार को गुरुपुष्यामृत योग: मनोकामना पूर्ति के लिए स्वामी सेवा करें!

Web Summary : 23 अप्रैल, 2026 को गुरुपुष्यामृत योग है। इस शुभ दिन पर स्वामी सेवा करना, मंत्रों का जाप करना और स्वामी मठ जाना मनोकामनाओं को पूरा करने और नकारात्मकता को दूर करने में सहायक माना जाता है। यह योग नई शुरुआत के लिए शुभ माना जाता है और समृद्धि लाता है।

Web Title : Gurupushyamrut Yoga on Thursday: Perform Swami Seva for wish fulfillment!

Web Summary : On April 23, 2026, Gurupushyamrut Yoga occurs. Performing Swami Seva, chanting mantras, and visiting Swami's Matha on this auspicious day is believed to fulfill wishes and remove negativity. This yoga is considered auspicious for new beginnings and brings prosperity.