Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न

विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न

Vijay Kedia Invested Stock : रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनीच्या स्टॉकमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. ही तेजी इतकी जबरदस्त होती की स्टॉकमध्ये काही वेळातच १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:49 IST2026-04-22T13:49:06+5:302026-04-22T13:49:06+5:30

Vijay Kedia Invested Stock : रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनीच्या स्टॉकमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. ही तेजी इतकी जबरदस्त होती की स्टॉकमध्ये काही वेळातच १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं.

Vijay Kedia bought 44 lakh shares of Websol Energy System stock upper circuit went up 2100 percent return in 5 years | विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न

विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न

Vijay Kedia Invested Stock : रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील 'वेबसोल एनर्जी सिस्टम' (Websol Energy System) या कंपनीच्या स्टॉकमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. ही तेजी इतकी जबरदस्त होती की स्टॉकमध्ये काही वेळातच १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं आणि शेअरची किंमत ९७.०९ रुपयांवर आली. दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी या स्मॉलकॅप कंपनीत गुंतवणूक करून आपल्या पोर्टफोलिओमध्ये तिचा समावेश केल्यानं ही तेजी आली आहे.

विजय केडियांनी खरेदी केला हिस्सा

कंपनीच्या ताज्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी कंपनीत हिस्सा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत विजय केडिया यांच्याकडे कंपनीचे ४४.४४ लाख शेअर्स होते, जे कंपनीच्या एकूण १.०२ टक्के हिस्स्याइतके आहेत. विजय केडिया यांनी हा हिस्सा कोणत्या किमतीला खरेदी केला, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कंपनीतील एखाद्या गुंतवणूकदाराचा हिस्सा १ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, कंपनीला त्यांचं नाव शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये देणं बंधनकारक असतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच गुंतवणूक केली आहे की आधीचा हिस्सा वाढवला आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

देशातील प्रमुख बँका कोणत्या व्याजदरावर देत आहेत पर्सनल लोन; पाहा कुठे मिळू शकते स्वस्त ऑफर

स्टॉकनं दिला मल्टीबॅगर परतावा

एनएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात स्टॉकमध्ये ३० टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. गेल्या ३ वर्षांत या स्टॉकनं गुंतवणूकदारांना ११२४ टक्के परतावा दिलाय, तर ५ वर्षांत २११६ टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

कंपनी डिविडेंड देण्याची शक्यता

कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक २७ एप्रिल रोजी होणार असून, त्यात तिमाही निकालांचं पुनरावलोकन आणि मंजुरी दिली जाईल. याच बैठकीत शेअरधारकांना दिला जाणारा अंतिम डिविडेंड जाहीर करण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे. जर डिविडेंड मंजूर झाला, तर ती मोठी गोष्ट असेल, कारण कंपनीनं १७ वर्षांपासून कोणताही डिविडेंड दिलेला नाही. कंपनीनं शेवटचा डिविडेंड सप्टेंबर २००९ मध्ये दिला होता.

कंपनी काय काम करते?

वेबसोल एनर्जी सिस्टम ही भारतातील एक कंपनी असून ती सोलर उत्पादनं, विशेषतः सोलर सेल आणि सोलर पॅनेलचं उत्पादन करते. कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पश्चिम बंगालमधील फाल्टा येथे आहे, जिथे या उत्पादनांची निर्मिती केली जाते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : विजय केडिया ने वेबसोल एनर्जी में निवेश किया, स्टॉक अपर सर्किट पर

Web Summary : विजय केडिया ने वेबसोल एनर्जी में निवेश किया, जिससे स्टॉक में तेजी आई और यह अपर सर्किट पर पहुंच गया। केडिया ने 4.44 मिलियन शेयर (1.02%) हासिल किए। स्टॉक ने पांच वर्षों में 2116% के साथ मल्टीबैगर रिटर्न दिया है। कंपनी 17 साल बाद लाभांश घोषित कर सकती है।

Web Title : Vijay Kedia invests in Websol Energy, stock hits upper circuit

Web Summary : Vijay Kedia invested in Websol Energy, causing the stock to surge and hit the upper circuit. Kedia acquired 4.44 million shares (1.02%). The stock has delivered multi-bagger returns, with 2116% in five years. The company may announce a dividend after 17 years.