Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > Personal Loan April 2026: देशातील प्रमुख बँका कोणत्या व्याजदरावर देत आहेत पर्सनल लोन; पाहा कुठे मिळू शकते स्वस्त ऑफर

Personal Loan April 2026: देशातील प्रमुख बँका कोणत्या व्याजदरावर देत आहेत पर्सनल लोन; पाहा कुठे मिळू शकते स्वस्त ऑफर

Personal Loan April 2026: आजच्या काळात पैशांची गरज कोणालाही कधीही पडू शकते. अशा परिस्थितीत आता बहुतेक लोक पर्सनल लोन घेण्यास पसंती देत आहेत कारण आजच्या डिजिटल युगात पर्सनल लोन घेणं खूप सोपं झालं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 12:24 IST2026-04-22T12:22:26+5:302026-04-22T12:24:56+5:30

Personal Loan April 2026: आजच्या काळात पैशांची गरज कोणालाही कधीही पडू शकते. अशा परिस्थितीत आता बहुतेक लोक पर्सनल लोन घेण्यास पसंती देत आहेत कारण आजच्या डिजिटल युगात पर्सनल लोन घेणं खूप सोपं झालं आहे.

Personal Loan April 2026 At what interest rate are the major banks in the country offering personal loans See where you can get the cheapest offer hdfc icici sbi bob axis | Personal Loan April 2026: देशातील प्रमुख बँका कोणत्या व्याजदरावर देत आहेत पर्सनल लोन; पाहा कुठे मिळू शकते स्वस्त ऑफर

Personal Loan April 2026: देशातील प्रमुख बँका कोणत्या व्याजदरावर देत आहेत पर्सनल लोन; पाहा कुठे मिळू शकते स्वस्त ऑफर

Personal Loan April 2026: आजच्या काळात पैशांची गरज कोणालाही कधीही पडू शकते. अशा परिस्थितीत आता बहुतेक लोक पर्सनल लोन घेण्यास पसंती देत आहेत कारण आजच्या डिजिटल युगात पर्सनल लोन घेणं खूप सोपं झालं आहे. लोक काही वेळातच आपल्या फोनवरून पर्सनल लोन घेऊ शकतात आणि आपल्या बँक खात्यात रक्कम मिळवू शकतात. अशात जर तुम्हीही येणाऱ्या दिवसांत बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा प्लॅन करत असाल, तर प्रथम तुम्हाला देशातील दिग्गज आणि प्रमुख बँकांच्या पर्सनल लोनच्या व्याजदरांबद्दल नक्कीच माहिती असायला हवी, ज्यावरून तुम्ही कमी व्याजदर असलेल्या बँकेकडून कर्ज घेऊ शकाल.

SBI पर्सनल लोन

SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना १०.०५ टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं पर्सनल लोन ऑफर करते. हे व्याजदर ग्राहकाची पात्रता आणि क्रेडिट स्कोरनुसार वेगवेगळे असू शकतात.

BOB पर्सनल लोन

बँक ऑफ बडोदा म्हणजेच BOB आपल्या ग्राहकांना १०.१५ टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं पर्सनल लोन ऑफर करते. हे व्याजदर देखील ग्राहकाची पात्रता आणि क्रेडिट स्कोरनुसार वेगवेगळे असू शकतात. या बँकेकडून तुम्ही १ लाख रुपयांपासून ते २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

HDFC बँक पर्सनल लोन

HDFC बँक ही देशातील दिग्गज खाजगी बँक आहे, जी आपल्या ग्राहकांना ९.९९ टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं पर्सनल लोन ऑफर करते. हे व्याजदर देखील ग्राहकाची पात्रता आणि क्रेडिट स्कोरनुसार वेगवेगळे असू शकतात. या बँकेकडून तुम्ही ५० लाख रुपयांपर्यंतचं पर्सनल लोन घेऊ शकता.

ICICI बँक पर्सनल लोन

दिग्गज खाजगी बँक ICICI बँक देखील आपल्या ग्राहकांना ९.९९ टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं पर्सनल लोन ऑफर करते. हे व्याजदर देखील ग्राहकाची पात्रता आणि क्रेडिट स्कोरनुसार वेगवेगळे असू शकतात.

ॲक्सिस बँक पर्सनल लोन

दिग्गज खाजगी बँक ॲक्सिस बँक आपल्या ग्राहकांना ८.७५ टक्के सुरुवातीच्या व्याजदरानं पर्सनल लोन ऑफर करते. हे व्याजदर देखील ग्राहकाची पात्रता आणि क्रेडिट स्कोअरनुसार वेगवेगळे असू शकतात.

Web Title : पर्सनल लोन अप्रैल 2026: प्रमुख भारतीय बैंकों की ब्याज दरें।

Web Summary : पैसों की ज़रूरत है? एसबीआई, बीओबी, एचडीएफसी, आईसीआईसीआई और एक्सिस बैंक से पर्सनल लोन की ब्याज दरों का पता लगाएं। दरें पात्रता और क्रेडिट स्कोर के आधार पर अलग-अलग होती हैं। एक्सिस बैंक 8.75% की शुरुआती दर प्रदान करता है।

Web Title : Personal Loan April 2026: Best interest rates from top Indian banks.

Web Summary : Need funds? Explore personal loan interest rates from SBI, BOB, HDFC, ICICI, and Axis Bank. Rates vary based on eligibility and credit score. Axis Bank offers the lowest starting rate at 8.75%.