डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 13:48 IST2026-04-22T13:46:45+5:302026-04-22T13:48:12+5:30

प्रेमा नावाच्या २७ वर्षीय महिलेने तिचा बॉयफ्रेंड किरणला घरी बोलावून 'वेस्टर्न स्टाईल' प्रपोज करणार असल्याचं सांगितलं.

‘Blindfold, western-style proposal’: Bengaluru woman held for burning boyfriend alive | डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं

डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं

बंगळुरूच्या बयादरहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनानगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमा नावाच्या २७ वर्षीय महिलेने तिचा बॉयफ्रेंड किरणला घरी बोलावून 'वेस्टर्न स्टाईल' प्रपोज करणार असल्याचं सांगितलं. पण याच दरम्यान तिने त्याची निर्घृण हत्या केली.

किरण हा तुमकुरु जिल्ह्यातील चिक्कनायकनहल्ली येथील रहिवासी असून तो राजाजीनगरमधील एका मोबाईल सिम स्टोअरमध्ये काम करत होता. किरण आणि प्रेमा एकाच टेलिकॉम कंपनीत होते आणि गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. 'न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टनुसार, किरण आपल्यापासून दुरावत असून त्याचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध असल्याचा संशय प्रेमाला होता. याच रागातून तिने ही भयंकर कट रचला.

प्रपोजच्या नावाखाली क्रूर प्लॅन

प्रेमाने किरणला फोन करून घरी बोलावलं. तो आल्यावर तिने त्याचे उत्साहात स्वागत केले आणि सांगितले की तिला 'वेस्टर्न स्टाईल'ने त्याला प्रपोज करायचं आहे. तिने किरणच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याचे हात-पाय दोरीने घट्ट बांधले. किरणने दोरी इतकी घट्ट का बांधली आहे असे विचारले असता, "ही वेस्टर्न स्टाईल प्रपोजची पद्धत आहे" असे सांगून तिने त्याची दिशाभूल केली.

जिवंत जाळलं

किरण पूर्णपणे असहाय्य झाल्यानंतर प्रेमाने त्याच्या अंगावर रॉकेल त्याला जिवंत जाळलं. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला किरण वेदनेने ओरडू लागला, पण त्याला मदत मिळू शकली नाही. घटनेच्या वेळी प्रेमाची आई आणि भाऊ घरात नव्हते. घटनेनंतर प्रेमाने स्वतः पोलिसांना माहिती दिली. किरणला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी प्रेमाला घटनास्थळावरून अटक केली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट झालं आहे. तिने दोरी, पट्टी आणि रॉकेलची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. किरणच्या वागण्यावर नाराज असल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण बंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Web Title : बेंगलुरु: वेस्टर्न प्रपोज के बहाने महिला ने प्रेमी को जिंदा जलाया

Web Summary : बेंगलुरु में एक महिला ने वेस्टर्न प्रपोज का झांसा देकर प्रेमी को बुलाया, अंधा किया, बांधा और जिंदा जला दिया। ईर्ष्या में पूर्वनियोजित हत्या को अंजाम दिया; महिला गिरफ्तार। अस्पताल में प्रेमी की मौत।

Web Title : Woman Kills Boyfriend in Bengaluru Under Pretext of Western Proposal

Web Summary : Bengaluru woman lured boyfriend with a Western proposal ruse, blindfolded him, tied him up, and fatally set him ablaze. Jealousy fueled the pre-planned murder; she's now arrested. The victim died in hospital.