अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:14 IST2026-04-20T13:11:40+5:302026-04-20T13:14:08+5:30

US Seizes Iranian Cargo Ship: इराण-अमेरिका यांच्यातील शस्त्रसंधी संपत असतानाच तणाव वाढला आहे. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये एक थरारक प्रसंग घडला असून इराणचे मोठे मालवाहू जहाज अमेरिकेने ताब्यात घेतले. 

US Navy Seizes Iranian Ship 'Touska' Near Strait of Hormuz watch video | अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा

अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा

US Seizes Iranian Cargo Ship Video: इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणची नाकेबंदी केली. होर्मुझ सामुद्रधुनीत लष्कर उतरवत ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांची नाकेबंदी केली. कडा पहारा असतानाच नाकेबंदी पार करण्याचा प्रयत्न करत असलेली एक मालवाहू जहाज अमेरिकेच्या लष्कराने ताब्यात घेतले. या कारवाईचा थरारक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

अमेरिका आणि इराण यांनी शस्त्रसंधीला मुदतवाढ दिली होती. २२ एप्रिल रोजी ही शस्त्रसंधी संपत असून, होर्मुझ सामुद्रधुनी युद्ध तळ बनले आहे. याच ठिकाणी अमेरिकेने लष्कर उतरवत इराणची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इराणी बंदराची अमेरिकेने नाकेबंदी केलेली असतानाच १९ एप्रिल रोजी एक घटना घडली. 

इराणी जहाज, अमेरिकेचे लष्कर; होर्मुझमध्ये काय घडले व्हिडीओ पहा

इराणच्या बंदरांची नाकेबंदी केल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेचे नौदलाने गस्त घालत आहे. याच वेळी एक महाकाय मालवाहू जहाज येताना दिसल्यानंतर अमेरिकेच्या लष्कराने त्याला थांबवण्याचे आदेश दिले. 

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, नौदलाचे जवान एम्फीबियस असॉल्ट युद्धनौका यूएसएस त्रिपोलीने रवाना झाले आणि १९ एप्रिल रोजी अरबी समुद्रातून उड्डाण केले आणि नंतर तुस्का जहाजावर पोहोचले.

अमेरिकन लष्कराच्या दाव्यानुसार, इराणी मालवाहू जहाजाला तब्बल सहा तास इशारा दिला जात होता. प्रत्येक वेळी जहाजाकडून संदेशाकडे दुर्लक्ष केले गेले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जहाजाची वेग यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली (म्हणजे इंजिन रुमवर हल्ला केला गेला.) त्यानंतर हेलिकॉप्टरने जहाजावर उतरून सैन्याने जहाज ताब्यात घेतले. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "अमेरिकेच्या सैन्य दलाने इराणचा झेंडा असलेले मालवाहून जहाज ताब्यात घेतले आहे.  इराणी जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title : अमेरिकी सेना ने होर्मुज जलडमरूमध्य में ईरानी जहाज को पकड़ा

Web Summary : अमेरिकी सेना ने छह घंटे के गतिरोध के बाद होर्मुज जलडमरूमध्य में एक ईरानी मालवाहक जहाज को जब्त कर लिया। जहाज ने कथित तौर पर अमेरिकी नाकाबंदी का उल्लंघन करने का प्रयास किया, जिसके बाद सैन्य कार्रवाई हुई।

Web Title : US Navy Seizes Iranian Ship in Hormuz Strait After Standoff

Web Summary : US forces seized an Iranian cargo ship in the Hormuz Strait after a six-hour standoff. The ship allegedly attempted to breach the US blockade, prompting military action and capture by US Marines.