Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 11:26 IST2026-04-20T11:25:24+5:302026-04-20T11:26:57+5:30

TCS Nida Khan : टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणी संशयित फरार निदा खानच्या मागावर ८ एप्रिलपासून एसआयटी पथक असताना तिने ११ एप्रिलला मुंब्रा येथे एका स्त्री प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टरकडे उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

TCS conversion case accused Nida Khan underwent treatment in Mumbai on April 11; Bail application to be heard today | Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी

Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी

नाशिक: टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार व धर्मांतर प्रयत्न प्रकरणी संशयित फरार निदा खानच्या मागावर ८ एप्रिलपासून एसआयटी पथक असताना तिने ११ एप्रिलला मुंब्रा येथे एका स्त्री प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टरकडे उपचार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर ती मुंब्रा येथून निसटल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. टीसीएसमधील याप्रकरणी माजी कर्मचारी निदाचे नाव आल्यापासून तिचा शोध सुरू आहे. ती मुंब्रा येथे असल्याची कुणकुण लागल्याने पोलिसांनी तिचा माग काढत तिच्या पतीची चौकशी केली. याच दरम्यान निदा हिने प्रसूती तज्ज्ञ महिलेकडून तपासणी करून घेतल्याचा सुगावा लागला.

दहा दिवस अगोदर निदा याच दवाखान्यात आली होती तेव्हा तिच्या तोंडावर मास्क नव्हता. मात्र, ११ एप्रिलला ज्यावेळी पुन्हा त्याच दवाखान्यात गेली तेव्हा तिने चेहरा पूर्ण दिसू नये, यासाठी मास्क लावला होता. यावेळी तिने संबंधित महिला डॉक्टरकडून 'बेड रेस्ट'चे वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले. हेच प्रमाणपत्र तिने नाशिकरोड न्यायालयात सादर करून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा

मी दोन महिन्यांपूर्वीच मुंब्रा येथे राहण्यास आले असून, खासगी कंपनीत काम करीत असल्याचे तिने संबंधित महिला डॉक्टरला सांगितले होते. ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे संबंधित महिला डॉक्टरने एसआयटीला सांगितले. दरम्यानच्या काळात निदा फरार असल्याच्या बातम्या फोटोसह झळकल्याने सावध होत ती अज्ञातस्थानी रवाना झाली. दिवसभर तिच्या घराला कुलूप असायचे. रात्री उशिरा पतीसह ती घरी यायची. दोन महिन्यांत ती कधीतरी दिसायची, अशी माहिती निदा राहत असलेल्या रहिवाशांनी एसआयटीला दिली.

७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा

जामीन अर्जावर आज सुनावणी

फरार निदा खानने नाशिकरोड कारागृहात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असून, त्यावर सोमवारी (दि. २०) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागून आहे. निदा ही गेल्या १३ दिवसांपासून तपास पथकाला गुंगारा देत आहे.

TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...

मानवाधिकार आयोगाकडूनही गंभीर दखल

टीसीएसप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. 'लीगल राइट्स ऑब्झर्व्हेटरी'च्या तक्रारीनंतर आयोगाने राज्याचे पोलिस महासंचालक, कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. तक्रारीत अंतर्गत तक्रार समिती नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयोगाने एफआयआरमधील संशयितांची माहिती स्पष्ट करण्यास सांगत सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने सखोल चौकशी करून 'अॅक्शन टेकन रिपोर्ट' सादर करण्याचे निर्देश दिले असून, कामगार आयुक्तांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सर्व शाखा, बीपीओ व उपकंपन्यांची माहिती देण्यास सांगितले आहे. कंपनीच्या सीईओंना 'पोश' समितीचे तपशील व मागील तीन वर्षांतील तक्रारींचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

 "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा

महिला आयोगाकडून पीडितेसह कुटुंबीयांचेही जबाब

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चार सदस्यीय तथ्यशोध समितीने टीसीएसमधील कथित धर्मातराचा प्रयत्न व लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी रविवारी (दि. १९) दुसऱ्या दिवशीदेखील केली. यात समितीने कंपनीतील पीडित मुली तसेच कुटुंबीयांचे जबाब घेतले. पहिल्या गुन्ह्यातील पीडितेचे राहणीमान घरात कशा पद्धतीने बदलले होते, तिचे तेव्हा घरातील वागणे कसे बदलले, याची माहिती कुटुंबीयांकडून घेतली. पीडितेला वैद्यकीय मदत, समुपदेशन, कायदेशीर साहाय्य मिळाले आहे का? याची खातरजमा महिला आयोगाच्या पथकाने पीडितांच्या कुटुंबीयांकडून घेतली.

"अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप

एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन गुन्ह्याचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती घेतली. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, हरयाणाचे माजी पोलिस महासंचालक बी. के, सिन्हा, सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील मोनिका अरोरा, राष्ट्रीय महिला आयोग समन्वयक लौलाबती यांचा समावेश आहे. दाखल गुन्ह्याप्रकरणी काय तपास केला, त्यामध्ये कोणत्या गोष्टी समोर आल्या, याची माहिती घेतल्याचे समजते. कंपनीत किती महिला कार्यरत होत्या, त्यापैकी किती महिलांचे संशयित आरोपींशी नेहमी बोलणे व्हायचे, याचीही माहिती पथकाने घेतली.

Web Title : TCS धर्मांतरण मामला: आरोपी निदा खान का इलाज, आज जमानत पर सुनवाई

Web Summary : टीसीएस धर्मांतरण मामले में आरोपी निदा खान ने मुंब्रा में इलाज कराया। पुलिस ने उसके पति से पूछताछ की। उसने बेड रेस्ट के लिए मेडिकल सर्टिफिकेट हासिल किया और अग्रिम जमानत के लिए अर्जी दी। मानवाधिकार आयोग और महिला आयोग भी मामले की जांच कर रहे हैं।

Web Title : TCS Conversion Case: Accused Nida Khan's Treatment, Bail Hearing Today

Web Summary : Nida Khan, accused in the TCS conversion case, sought treatment in Mumbra. Police investigated her husband. She obtained a medical certificate for bed rest and filed for anticipatory bail. The Human Rights Commission and Women's Commission are also investigating the case.