लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 12:41 IST2026-04-20T12:40:16+5:302026-04-20T12:41:47+5:30

Dombivli Viral Video: रिक्षाचालकांची मुजोरी डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही; परंतु याचा प्रत्यय पुन्हा शनिवारी एका प्रवाशाला आला.

Man stands for 15 minutes with daughter on his shoulder, even waved to 100 rickshaws...; Video from Dombivli goes viral | लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल

AI Image

डोंबिवली: रिक्षाचालकांची मुजोरी डोंबिवलीकरांसाठी नवीन नाही; परंतु याचा प्रत्यय पुन्हा शनिवारी एका प्रवाशाला आला. १०० रिक्षांना हात दाखवूनही कोणीही थांबला नाही. अखेर आपल्या दीड वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेऊन पाऊण तास उभ्या असलेल्या बापाने संताप व्यक्त करीत सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केला आहे.

पूर्वेकडील एमआयडीसी निवासी भागात राहणारे दर्शन परब हे शनिवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान रेल्वेस्टेशन परिसरातील बाजीप्रभू चौकातून टिळकनगर येथे जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास परब यांना रिक्षाच मिळाली नाही. परब यांच्यासोबत त्यांची दीड वर्षाची मुलगी आणि पत्नी सोबत होती.

रिक्षाचालकांची मुजोरी वाढली

मनसेचे माजी आ. राजू पाटील यांनी व्हिडीओ समाजमाध्यमावर टाकत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. रिक्षाचालकांची मुजोरी प्रचंड वाढली आहे. कल्याण-डोंबिवलीत येऊन वाहतूक व परिवहन व्यवस्थेची झाडाझडती घ्यावी, अशी विनंती पाटील यांनी सरनाईकांना केली आहे.

Web Title : डोंबिवली: बच्ची के साथ पिता बेहाल, 100 कोशिशों के बाद भी रिक्शा नहीं।

Web Summary : डोंबिवली में एक निवासी, अपनी बच्ची और पत्नी के साथ, 45 मिनट से अधिक समय तक रिक्शा ढूंढने के लिए संघर्ष करता रहा। 100 रिक्शा रोकने की कोशिश के बावजूद कोई नहीं रुका, जिसके बाद उसने अपनी निराशा ऑनलाइन साझा की। यात्रियों को रिक्शा की उपलब्धता के साथ बढ़ती समस्याओं का सामना करना पड़ रहा है।

Web Title : Dombivli: Father stranded with baby, no rickshaw after 100 attempts.

Web Summary : A Dombivli resident, with his baby and wife, struggled to find a rickshaw for over 45 minutes. Despite flagging down 100 rickshaws, none stopped, prompting him to share his frustration online. Commuters face increasing issues with rickshaw availability.