Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?

सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?

Gold Silver Price Today: कमोडिटी बाजारात आज (२० एप्रिल) आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 10:55 IST2026-04-20T10:55:25+5:302026-04-20T10:55:59+5:30

Gold Silver Price Today: कमोडिटी बाजारात आज (२० एप्रिल) आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली.

Gold Silver Price Today: Gold prices fell by more than ₹1,500; Silver also fell by ₹5,000; What next..?busi | सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?

सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?

Gold Silver Price Today: कमोडिटी बाजारात आज (सोमवार, २० एप्रिल) आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. MCX वर सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या दर लक्षणीयरित्या घसरले. सकाळी सुमारे ९:१० वाजता सोने १% किंवा १,५०० रुपयांपेक्षा अधिक घसरून १,५३,०३० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेड करत होते. तर चांदीचा दरही सुमारे ५,००० रुपयांनी घसरून २,५३,१६८ रुपये प्रति किलोवर आला.

याआधीच्या सत्रात सोने १,५४,६०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते, तर चांदी ३.८% वाढीसह २,५८,०७९ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव

जागतिक बाजारातही सोन्या-चांदीवर दबाव दिसून आला. स्पॉट गोल्ड ०.४% घसरून ४,८०९.७१ डॉलर प्रति औंसवर आले. तर अमेरिकन गोल्ड फ्युचर्स (जून डिलिव्हरी) १% घसरून ४,८२९.४० डॉलरवर ट्रेड करत होते. स्पॉट सिल्व्हरही ०.५% घसरून ८०.३६ डॉलर प्रति औंसवर आले.

घसरणीमागची कारणे काय?

या घसरणीमागे प्रमुख कारण म्हणजे वाढलेला भू-राजकीय तणाव. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिका-इराण युद्धविराम तुटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे बाजारातील अनिश्चितता पुन्हा वाढली आहे. तणाव वाढल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, महागाईची शक्यता वाढली आणि अमेरिकन डॉलरही मजबूत झाला, ज्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे.

डॉलर आणि बॉन्ड यील्डचा प्रभाव

डॉलर इंडेक्स मजबूत झाल्यामुळे डॉलरमध्ये व्यवहार होणारे सोने इतर चलनधारकांसाठी महाग झाले आहे. अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी बॉन्डवरील यील्डमध्येही ०.५% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मिडल ईस्टमधील तणावामुळे खाडी देशांमधून होणारी शिपिंग मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्यामुळे तेलाच्या किमतीतदेखील वाढ झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांत ८% घसरण

फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर सोन्याच्या किमतीत सुमारे ८% घसरण झाली आहे. सोने हे महागाईपासून संरक्षण देणारे गुंतवणूक साधन मानले जाते. मात्र, व्याजदर वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते, कारण गुंतवणूकदार अधिक परतावा देणाऱ्या साधनांकडे (उदा. बॉन्ड) वळतात. एकूणच सध्या बाजारात अनिश्चितता आणि जागतिक तणाव यांचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेऊन बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

(टीप- कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title : सोना ₹1,500 से अधिक गिरा, चांदी ₹5,000 सस्ती; आगे क्या?

Web Summary : कमोडिटी बाजार में सोना-चांदी के दाम गिरे। भू-राजनीतिक तनाव, खासकर अमेरिका-ईरान संबंध, अनिश्चितता बढ़ाते हैं। कच्चे तेल की बढ़ती कीमतें, मजबूत डॉलर और बढ़ी हुई बॉन्ड यील्ड गिरावट में योगदान करते हैं। निवेशकों को सतर्क रहना चाहिए।

Web Title : Gold prices plunge ₹1,500+, silver down ₹5,000; what's next?

Web Summary : Commodity markets see gold and silver prices plummet. Geopolitical tensions, especially US-Iran relations, fuel uncertainty. Rising crude oil prices, a stronger dollar, and increased bond yields contribute to the decline. Investors should remain cautious.