कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 16:49 IST2026-04-20T16:48:30+5:302026-04-20T16:49:10+5:30
आळसामुळे फोन कव्हरला 'मिनी-वॉलेट' बनवणं तुमच्या फोनसाठी घातक ठरू शकतं. ही सवय वेळीच का बदलली पाहिजे, ते जाणून घेऊया...

कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, अनेक लोक आपल्या फोन कव्हरच्या मागे पैसे ठेवतात. बाहेर गेल्यावर सोयीसाठी तिथूनच पैसे काढून पेमेंट केलं जातं. काही लोकांसाठी हा एक प्रकारचा 'इमर्जन्सी फंड' असतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का? केवळ आळसामुळे फोन कव्हरला 'मिनी-वॉलेट' बनवणं तुमच्या फोनसाठी घातक ठरू शकतं. ही सवय वेळीच का बदलली पाहिजे, ते जाणून घेऊया...
फोन कव्हरमध्ये पैसे ठेवण्याचे तोटे
फोन ओव्हरहीट होऊ शकतो
जेव्हा फोन आणि कव्हरच्या मध्ये कागदी नोट ठेवली जाते, तेव्हा ती फोनमधील उष्णता बाहेर पडण्याचा मार्ग रोखते. नोट एका 'इन्सुलेटर'प्रमाणे काम करते, ज्यामुळे फोनची उष्णता आतच अडकून राहते. याचा परिणाम म्हणून फोनची बॅटरी फुगू शकते, प्रोसेसरचा वेग मंदावू शकतो आणि फोन वारंवार हँग होऊ लागतो.
कॅमेरा आणि फ्लॅशमध्ये अडथळा
अनेकदा कव्हरमधील नोट सरकते आणि कॅमेरा लेन्स किंवा फ्लॅशचा काही भाग झाकला जातो. यामुळे फोटोची क्वालिटी तर खराब होतेच, पण फ्लॅशचा प्रकाशही नीट पडत नाही.
स्फोट होण्याचा धोका
आजकालच्या स्मार्टफोनमध्ये 'फास्ट चार्जिंग'चं फिचर असतं, ज्यामुळे चार्जिंग दरम्यान फोन बराच गरम होतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही कव्हरमध्ये नोट ठेवून फोन चार्ज केला, तर फोन अधिकच तापतो. यामुळे नोट पेट घेऊ शकते आणि फोनचा स्फोट होण्याचा मोठा धोका निर्माण होतो.