"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:30 IST2026-04-21T12:29:48+5:302026-04-21T12:30:21+5:30

India sends message to Pakistan on One Year after Pahalgam Attack: ऑपरेशन सिंदूरचा प्रतिकात्मक फोटो लावून भरला सज्जड दम

india does not forget when boundaries of humanity crossed response is decisive message to pakistan ahead of one year after Pahalgam attack | "भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश

"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश

India sends message to Pakistan on One Year after Pahalgam Attack: २२ एप्रिल २०२५ ... हा दिवस भारतासाठी एक काळा दिवस होता. भारताचे हृदय पिळवटून टाकणारी पहलगाम हल्ल्याची घटना या दिवशी घडली. पाकिस्तानात आलेल्या काही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सामान्य नागरिकांवर हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला. त्यावेळच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य केले आणि २६ जणांचा जीव घेतला. उद्या बुधवारी पहलगाम हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. याच निमित्ताने एक दिवस आधी, भारतीय लष्कराने एक महत्त्वपूर्ण पोस्ट करून पाकिस्तानला एक संदेश दिला आहे.

लष्कराचा पाकला संदेश

भारतीय लष्कराने एक फोटो आणि एक्स पोस्ट शेअर केली आहे. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवले होते, त्याचा फोटो पोस्ट करत त्यावर लिहिण्यात येत आहे की, काही मर्यादा किंवा सीमा कधीही ओलांडू नयेत. भारत काहीही विसरत नाही. या फोटोसोबतच एक कॅप्शनदेखील लिहिण्यात आले आहे. "जेव्हा माणुसकीच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रत्युत्तर हे निर्णायक असते. भारत कधीही हल्ले विसरत नाही. ज्या निष्पाप लोकांचा बळी घेतला गेला, त्यांना न्याय देण्यात आला आहे. भारत एकसंध आहे," असे कॅप्शन या फोटोसह देत पाकिस्तानला रोखठोक संदेश देण्यात आला आहे.

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झाला होता भ्याड हल्ला

२२ एप्रिल २०२५ ला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत मृत्यूचे तांडव केले. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा बळी गेला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

भारताचे प्रत्युत्तर: ऑपरेशन सिंदूर

पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. ६-७ मे रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य केले. २२ ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती.

Web Title : भारत की पाकिस्तान को चेतावनी: पहलगाम हमले की बरसी पर याद दिलाया सबक

Web Summary : पहलगाम हमले की बरसी पर भारत ने पाकिस्तान को याद दिलाया सबक, जिसमें 26 लोग मारे गए थे। सेना के 'ऑपरेशन सिंदूर' ने न्याय किया, साबित हुआ भारत नहीं भूलता।

Web Title : India Warns Pakistan: Transgressions Remembered After Pahalgam Attack Anniversary

Web Summary : India reminds Pakistan of consequences a year after the Pahalgam attack, which killed 26. The army's 'Operation Sindoor' served justice, proving India doesn't forget.