मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:07 IST2026-04-21T14:06:25+5:302026-04-21T14:07:01+5:30
या नवीन एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स आणि रेंजसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही कार खास भारताच्या दृष्टीने आणि भारतातच तयार करण्यात येणार असल्याचे समजते.

संग्रहित फोटो...
भारतीय बाजरातील इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलियोमध्ये साततत्याने वाढ होताना दिसत आहे. या वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, ह्युंदाई (Hyundai) आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी एक नवीन खास इलेक्ट्रिक SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन एसयूव्हीचे डिझाइन, फीचर्स आणि रेंजसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, ही कार खास भारताच्या दृष्टीने आणि भारतातच तयार करण्यात येणार असल्याचे समजते.
खास असेल डिझाइन आणि फिचर्स -
ही नवीन ईव्ही 'क्रेटा इलेक्ट्रिक'च्या खालच्या सेगमेंटमध्ये लॉन्च होऊ शकते. यामुळे ती अधिक बजेट-फ्रेंडली ठरेल. ही कार बॉक्सी डिझाइनसह स्प्लिट एलईडी हेडलाइट्स, स्टायलिश अलॉय व्हील्स आणि मॉडर्न एलईडी डीआरएल्स (DRLs) मुळे अत्यंत फ्युचरिस्टिक दिसेल. इंटीरियरमध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारख्या आधुनिक सुविधा मिळतील. महत्वाचे म्हणजे, सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला लेव्हल-२ ADAS सारखे प्रगत फिचरही दिले जाऊ शकते.
४०० ते ५०० किमीची ढासू रेंज -
मिळालेल्या माहितीनुसार, या कारमध्ये ४० kWh चा बॅटरी पॅक असू शकतो, जो एका चार्जवर ४०० ते ५०० किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. यामध्ये फास्ट चार्जिंग आणि V2L (Vehicle-to-Load) सारखे आधुनिक फीचर्सही मिळतील. या कारची थेट स्पर्धा टाटा नेक्सॉन ईव्ही, टाटा पंच ईव्ही आणि महिंद्रा XUV 3XO ईव्ही यांच्याशी असेल. ह्युंदाईची ही बजेट ईव्ही २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ पर्यंत भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकते.