Apple CEO Tim Cook Net Worth: जगातील सर्वात मूल्यवान टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Apple मध्ये खांदेपालट झाले आहे. कंपनीचे विद्यमान CEO टिम कुक लवकरच पद सोडणार असून त्यांच्या जागी जॉन टर्नस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टर्नस येत्या १ सप्टेंबर २०२६ पासून CEO पदाची जबाबदारी स्वीकारतील. तसेच, मागील १५ वर्षांपासून CEO पदावर कार्यरत असलेल्या टिम कुक यांना ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
१५ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ
टिम कुक यांनी जवळपास १५ वर्षे Apple चे नेतृत्व केले आणि कंपनीला नव्या उंचीवर पोहोचवले. त्यांनी अचानक पद सोडल्यामुळे टेक क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, टिम कुक यांनी पद सोडल्यानंतर त्यांना कंपनीकडून मिळणारा पगार आणि संपत्तीबाबत इंटरनेटव/सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
टिम कुक यांची संपत्ती किती?
Forbes च्या आकडेवारीनुसार, एकूण संपत्ती सुमारे २.९ अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹२४,००० कोटी) आहे. तसेच, त्यांना कंपकडून वार्षिक सुमारे ६३ मिलियन डॉलर्स (अंदाजे ₹५२५ कोटी) पॅकेज मिळते. याशिवाय, त्यांच्याकडे Apple चे ३० लाखांहून अधिक शेअर्सदेखील आहेत. त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग Apple च्या शेअर्समधून येतो.
Apple ची जबरदस्त वाढ
टिम कुक यांच्या नेतृत्वाखाली Apple ने मोठी प्रगती केली. कंपनीची मार्केट व्हॅल्यू ३५० अब्ज डॉलर्सवरून सुमारे ४ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवली. तसेच, वार्षिक महसुलातही मोठी वाढ झाली.
स्टीव्ह जॉब्सनंतर जबाबदारी
टिम कुक यांनी २०११ मध्ये Steve Jobs यांच्या निधनापूर्वी CEO पद स्वीकारले होते. ते जवळपास २८ वर्षांपासून Apple सोबत जोडलेले आहेत. टिम कुक यांच्या नेतृत्वाखाली Apple ने अभूतपूर्व यश मिळवले. आता जॉन टर्नस यांच्या रूपाने कंपनीला नवे नेतृत्व मिळणार असून, पुढील काळात Apple कोणत्या दिशेने वाटचाल करेल याकडे संपूर्ण टेक जगाचे लक्ष लागले आहे.
