Next

नथुराम गोडसेला मोठं करण्याचा डाव? Jitendra Awhad On Mahesh Manjrekar | Godse Movie | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:43 AM2021-10-04T09:43:07+5:302021-10-04T09:43:33+5:30

प्रसिद्ध नट, निर्माता, दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक असलेल्या महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधी जयंती निमित्ताने एका सिनेमाची घोषणा केलीय... अशा विषयावरचा सिनेमा, जो देशाच्या सामाजिक, राजकीय पटलावर नेहमीच वादाचा विषय राहिलाय. सिनेमाचं नाव आहे... गोडसे... हो, तोच गोडसे, ज्यानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली... जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या आणि जगभरातील प्रत्येकासाठी पूजनीय असणाऱ्या महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला अनेकदा हीरो बनवण्याचे प्रयत्न झाले... त्यावरून बऱ्याचदा वादही निर्माण झाले... मात्र, याच वादग्रस्त विषयावर सिनेमा बनवण्याची घोषणा मांजरेकरांनी केलीय... आणि त्याचा मुहूर्त शोधलाय, २ ऑक्टोबर... म्हणजेच... महात्मा गांधींच्या जयंतीचा... त्याचा मांजरेकरांनी जाहीर केलेला टीझर पाहूयात...