ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 13:54 IST2026-04-26T13:54:17+5:302026-04-26T13:54:32+5:30
Karoline Leavitt viral statement Trump attack 2026: व्हाईट हाऊस प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांचे विधान ट्रम्प यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर तुफान व्हायरल झाले आहे. ४५ वर्षांनंतर वॉशिंग्टन हिल्टनमध्ये झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. आरोपी कोल टॉमस ॲलन याला अटक करण्यात आली असून, पंतप्रधान मोदींनीही या घटनेचा निषेध केला आहे.

ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम
शनिवारी रात्री वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर' सुरू असताना एका माथेफिरूने केलेल्या गोळीबाराने संपूर्ण हॉलमध्ये घबराट पसरली. शेकडो पत्रकार आणि प्रतिष्ठित पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या हल्ल्याने अमेरिकन सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्या आहेत. व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये झालेला गोळीबार हा केवळ सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा विषय ठरला नाही, तर प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांच्या विधानामुळे तो आता संशयाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कार्यक्रमापूर्वी 'रेड कार्पेट'वर पत्रकारांशी बोलताना कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आगामी भाषणाबद्दल भाष्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या, की "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आज मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. आजचे त्यांचे भाषण क्लासिक 'डोनाल्ड जे. ट्रम्प' स्टाईलचे असेल. ते विनोदी आणि मनोरंजक असेलच, पण आज रात्री या हॉलमध्ये 'गोळ्या चालतील', त्यामुळे सर्वांनी हे नक्की पाहावे."
नेमकं काय होतं ते विधान?
कार्यक्रमापूर्वी एका पत्रकाराशी संवाद साधताना लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भाषणाबद्दल उत्सुकता वाढवण्यासाठी एक विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, "आज रात्री गोळ्या चालतील ". त्यांचा हा संदर्भ ट्रम्प यांच्या आक्रमक आणि रोखठोक भाषणशैलीशी संबंधित होता. दुर्दैवाने, भाषण सुरू असतानाच खरोखर गोळीबार झाला आणि सुरक्षा रक्षकांना ट्रम्प यांना तातडीने मंचावरून हटवावे लागले.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
इतक्या हाय-प्रोफाइल कार्यक्रमात, जिथे सीक्रेट सर्व्हिसचे कडेकोट बंदोबस्त असतो, तिथे हल्लेखोर शस्त्र घेऊन पोहोचलाच कसा? हा आता अमेरिकन सुरक्षा यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.