तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:20 IST2026-04-27T14:19:54+5:302026-04-27T14:20:39+5:30

Tehran fuel storage tanks destruction news: इराणची राजधानी तेहरानमध्ये इंधन साठवणूक टाक्यांच्या नुकसानीमुळे ८ कोटी लीटर इंधन वाया गेले आहे. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ५० टक्क्यांनी घटली असून, नागरिकांना ऊर्जा बचतीचे आवाहन करण्यात आले आहे.

Terrible crisis in Tehran! 80 million liters of oil wasted in fuel tank explosion; Governor makes important appeal to citizens | तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

इराणची राजधानी तेहरानमध्ये वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या हवाई हल्ल्यांत इंधन साठवणुकीच्या टाक्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेहरानचे राज्यपाल मोहम्मद सादेग मोतामेदियन यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, या घटनेत ८ कोटी लिटरहून अधिक इंधन जळून खाक झाले आहे. या नुकसानीमुळे आता शहरात इंधन आणि ऊर्जेची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

इंधन वापरामध्ये ५० टक्क्यांची मोठी घट
राज्यपालांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या संकटकाळात तेहरानमधील इंधनाच्या वापरात सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे.  नाकेबंदी आणि युद्धाच्या भीतीमुळे रस्ते ओस पडले असून ट्रॅफिकमध्ये मोठी घट झाली आहे. खाजगी वाहने वापरण्याऐवजी नागरिक आता मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत.

पाणी, वीज आणि गॅस वाचवण्याचे आवाहन
राज्यातील बिकट परिस्थिती पाहता, राज्यपालांनी जनतेला पाणी, वीज, गॅस आणि इंधन अत्यंत जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. ऊर्जेची जास्तीत जास्त बचत करणे हेच आता या संकटातून बाहेर पडण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेट्रोल पंप सुरूच राहणार...
इतक्या मोठ्या प्रमाणावर इंधन वाया जाऊनही, शहरातील एकाही पेट्रोल पंपाला टाळे ठोकण्याची वेळ आलेली नाही. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे मोतामेदियन यांनी सांगितले.

Web Title : तेहरान ईंधन डिपो विस्फोट: लाखों लीटर नष्ट, संकट गहराया

Web Summary : तेहरान के ईंधन डिपो में एक बड़े विस्फोट से लाखों लीटर ईंधन नष्ट हो गया, जिससे संकट आ गया है। राज्यपाल नागरिकों से पानी, बिजली, गैस और ईंधन बचाने का आग्रह करते हैं। ईंधन का उपयोग 50% तक गिर गया है। कमी के बावजूद पेट्रोल पंप खुले हुए हैं, अधिकारी स्थिति को संभालने के लिए काम कर रहे हैं।

Web Title : Tehran Fuel Depot Blast: Millions of Liters Lost, Crisis Looms

Web Summary : A massive explosion at Tehran's fuel depot destroyed millions of liters of fuel, prompting a crisis. The governor urges citizens to conserve water, electricity, gas, and fuel. Fuel usage has dropped by 50%. Petrol pumps remain open despite the shortage, with authorities working to manage the situation.