Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:08 IST2026-04-27T08:28:16+5:302026-04-27T10:08:24+5:30

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News 27 April 2026: US Iran Tensions, Strait of Hormuz, Donald Trump, US firing, West Bengal Election, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Aam Aadmi Party, Ashok Kharat Crime, Marathi For Rickshaw Taxi Drivers | Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल

Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

27 Apr, 26 : 11:04 AM

पाणीपुरी, छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग

तेलकट-मसालेदार आणि खराब अन्नामुळे लोक आजारी पडत आहेत. झारखंडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गिरिडीह येथे पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने एका ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर इतर १८ मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत. वाचा सविस्तर

27 Apr, 26 : 11:03 AM

भाजपची मतंही फोडतील इतके 'महान' आहेत शिंदे!" संजय राऊतांची टोलेबाजी

खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना विधान परिषद निवडणूक, उद्धव ठाकरे-फडणवीस भेट आणि मुंबईतील नामांतराच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. आपल्या खास शैलीत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर बोचरी टीका केली आहे.

विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत विचारले असता राऊत म्हणाले, "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील. अर्ज भरताना सर्वांना निमंत्रण दिले जाईल."

27 Apr, 26 : 10:20 AM

७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या रशिया दौऱ्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. जर इराणने तीन दिवसांत करार केला नाही, तर त्यांच्या तेलवाहिन्यांमध्ये मोठा स्फोट घडवून आणला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. इराण तेल निर्यात करू शकणार नाही. नाकेबंदीमुळे इराण जहाजांमार्फत निर्यात करू शकत नाही. आणि पाइपलाइन कोसळल्यानंतर त्याची निर्यात पूर्णपणे थांबेल, असे ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. इराणचे परराष्ट्र मंत्री पुन्हा एकदा पाकिस्तानहून रशियात पोहोचले आहेत. ते आता पुतिन यांच्याशी चर्चा करणार आहेत. रशियन माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे. (सविस्तर वाचा)

27 Apr, 26 : 10:07 AM

IPL 2026: प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल

आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात आता प्लेऑफची चुरस अधिकच वाढली आहे. प्रत्येक सामन्यागणिक गुणतालिकेतील समीकरणे बदलताना दिसत असून, नुकत्याच झालेल्या थरारक सामन्याने स्पर्धेला नवे वळण दिले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपर जाएंट्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. मात्र, या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. 

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

27 Apr, 26 : 09:41 AM

मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका वृद्ध व्यक्तीला बाईकस्वाराने धडक दिली. या अपघातात एक ज्येष्ठ व्यक्ती आणि बाईकवर असलेले तरुण-तरुणी असा एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे.

27 Apr, 26 : 08:52 AM

इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन राजनैतिक वळण आले आहे. इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला आपल्या 'रेड लाईन्स' कळवल्या आहेत, म्हणजेच वाटाघाटींसाठी स्पष्ट मर्यादा आणि अटी सांगितल्या आहेत. परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या इस्लामाबाद दौऱ्यादरम्यान हा प्रस्ताव पाठवला आहे.

27 Apr, 26 : 08:46 AM

मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी

मुंबई - स्वामी समर्थनगर ते विक्रोळी मेट्रो ६ मार्गिकेच्या पश्चिम रेल्वेमार्गावर १६९ टन वजनाच्या आणि ४२ मीटर लांबीच्या स्टील स्पॅनची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली. जोगेश्वरी परिसरात पश्चिम रेल्वेच्या कार्यरत मार्गावर अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वाच्या पिलरची उभारणी, तसेच पहिल्या स्टील कॉम्पोझिट स्पॅनची यशस्वी उभारणी केल्याने या प्रकल्पातील एक टप्पा पार झाला आहे.  (सविस्तर वाचा)

Web Title: Maharashtra Marathi News 27 April 2026: US Iran Tensions, Strait of Hormuz, Donald Trump, US firing, West Bengal Election, PM Narendra Modi, CM Devendra Fadnavis, IPL 2026, Aam Aadmi Party, Ashok Kharat Crime, Marathi For Rickshaw Taxi Drivers