Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले

Share Market Today: घरगुती शेअर बाजारात आज सोमवारी मजबूत सुरुवात झाली आहे. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ झाली होती, तर निफ्टीदेखील १०० हून अधिक अंकांनी वधारला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:08 IST2026-04-27T10:03:19+5:302026-04-27T10:08:22+5:30

Share Market Today: घरगुती शेअर बाजारात आज सोमवारी मजबूत सुरुवात झाली आहे. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ झाली होती, तर निफ्टीदेखील १०० हून अधिक अंकांनी वधारला होता.

Stock market starts with a bullish start Sensex gains more than 500 points Nifty also gains these stocks rise | शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले

Share Market Today: घरगुती शेअर बाजारात आज सोमवारी मजबूत सुरुवात झाली आहे. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ झाली होती, तर निफ्टीदेखील १०० हून अधिक अंकांनी वधारला होता. बँक निफ्टी ३०० हून अधिक अंकांच्या तेजीसह व्यवहार करत होता. निफ्टी ऑटो आणि एफएमसीजी (FMCG) इंडेक्समध्ये चांगली वाढ दिसून आली.

सकाळी ०९:२८ वाजता सेन्सेक्स ५२० अंकांनी वधारून ७७,१७६ वर होता. यादरम्यान निफ्टी १६१ अंकांच्या वाढीसह २४,०५८ च्या आसपास होता. बँक निफ्टी २५१ अंकांनी वर असून ५६,३१५ वर व्यवहार करत होता. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये १% पर्यंत तेजी होती, म्हणजेच आज ब्रॉडर मार्केटमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती.

Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन

सन फार्मा टॉप गेनर; ॲक्सिस बँकेत घसरण

निफ्टी ५० वर 'सन फार्मा'चा शेअर ३% पेक्षा जास्त वधारला होता. कंपनीनं 'Organon' खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली असून, ३.९९ बिलियन डॉलरमध्ये हे अधिग्रहण केलं जाणार आहे. या बातमीमुळे शेअर टॉप गेनर ठरला. याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, कोटक बँक, टाटा स्टील आणि विप्रोमध्ये तेजी दिसून आली. दुसरीकडे, निकाल जाहीर झाल्यानंतर 'ॲक्सिस बँक' (Axis Bank) ४% पेक्षा जास्त घसरली. श्रीराम फायनान्स, बीईएल (BEL), बजाज फायनान्स आणि रिलायन्सच्या शेअर्समध्येही घसरण नोंदवण्यात आली.

जागतिक आणि घरगुती ट्रिगर्स

बाजारासमोर जागतिक आणि घरगुती स्तरावर अनेक मोठी आव्हानं आहेत. एकीकडे इराण-अमेरिका शांतता चर्चा रखडल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे, तर दुसरीकडे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FIIs) मोठी विक्री आणि कमकुवत रुपया बाजारावर दबाव वाढवू शकतात. मात्र, अमेरिकन आणि आशियाई बाजारांमधील मजबुतीमुळे सुरुवातीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलात सलग सहाव्या दिवशी तेजी

इराणसोबतची शांतता चर्चा रखडल्यानंतर कच्च्या तेलातील दरवाढीचं चक्र सुरूच आहे. ब्रेंट क्रूड उसळी घेऊन प्रति बॅरल १०७ डॉलरच्या जवळ पोहोचलं. यामुळे जागतिक महागाई आणि भारताच्या आयात बिलाबाबत चिंता वाढली आहे.

Web Title : शेयर बाजार की मजबूत शुरुआत, सेंसेक्स में उछाल, निफ्टी में तेजी।

Web Summary : भारतीय शेयर बाजार में मजबूत शुरुआत, सेंसेक्स 500 अंक से अधिक चढ़ा, निफ्टी ऑटो और एफएमसीजी क्षेत्र से ऊपर। सन फार्मा को अधिग्रहण की खबर से लाभ। एक्सिस बैंक परिणाम के बाद गिरा। तेल की कीमतों और एफआईआई की बिक्री को लेकर वैश्विक चिंताएँ।

Web Title : Stock market opens strong; Sensex surges, Nifty gains, select shares rise.

Web Summary : Indian stock market starts strong, Sensex up over 500 points, Nifty boosted by auto and FMCG sectors. Sun Pharma gains on acquisition news. Axis Bank declines after results. Global concerns persist regarding oil prices and FII selling.