IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!

मुंबई इंडियन्ससह लखनौसाठी आता प्रत्येक सामना महत्त्वाचा

By सुशांत जाधव | Updated: April 27, 2026 09:25 IST2026-04-27T09:15:14+5:302026-04-27T09:25:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Points Table Favourites For Playoffs Who Can Qualify Check Latest Standings After LSG vs KKR Match 38 | IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!

IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!

IPL 2026 Points Table LSG vs KKR 38 th Match : आयपीएल २०२६ स्पर्धेतील १९ व्या हंगामातील स्पर्धेत आता प्लेऑफ्सची शर्यत सुरु झाली आहे. लखनौच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का देत कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या विजयसाह गुणतालिकेत आठव्या स्थानावर झेप घेतली असून आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दुसरीकडे सहाव्या पराभवामुळे लखनौ सुपर जाएंट्सचा संघ तळाला पोहचला आहे. इथं एक नजर टाकुयात प्लेऑफ्ससाठी कोणता संघ मजबूत स्थितीत आहे? या शर्यतीत टिकून राहण्यासाठी कोणत्या संघाला कसरत करावी लागणार? यासंदर्भातील सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पंजाब किंग्सची नंबर वन कामगिरी

सध्याच्या घडीला पंजाब किंग्स (PBKS) फ्रँचायझी संघ कमालीची कामगिरी करत असून त्यांना रोखणं कोणत्याही फ्रँचायजीसमोर एक मोठ टास्क आहे. सात सामन्यांमधून १३ गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील प्रभावी गोलंदाजी आणि अत्यंत आक्रमक व भक्कम फलंदाजी हे त्यांच्या यशाचे रहस्य आहे, ज्यामुळे त्यांना लीगमध्ये सर्वोत्तम नेट रन रेट (NRR) मिळाला आहे.

रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो

गत चॅम्पियन RCB सह SRH आणि RR टॉप ४ मध्ये

त्यापाठोपाठ गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे संघ आहेत, या तिन्ही संघांनी प्रत्येकी १० गुण कमावले आहेत. SRH ने ८ सामने खेळले आहेत आणि आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्यांनी विजयाची लय पकडली आहे. युवा स्टार वैभव सूर्यवंशीच्या अप्रतिम फलंदाजीमुळे राजस्थान संघ ८ सामन्यांनंतर १० गुणांसह आघाडीच्या चारमध्ये दिसतो. 

GT सह DC अजूनही सेफ झोनमध्ये, पण...

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या संघाने (GT) पुन्हा एकदा आपला विजयी फॉर्म्युला शोधत ८ पैकी ४ विजयासह ८  गुणांसह टॉप ५ मध्ये एन्ट्री मारली आहे. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) प्रत्येकी ६ गुणांसह बरोबरीत आहेत. यात गुजरात आणि दिल्लीचा संघ अजूनही सेफ झोनमध्ये आहे. चेन्नईनं ८ सामन्यानंतर ६ गुणांची कमाई केली असल्याने त्यांना उर्वरित सामन्यात जोर लावावा लागेल.

KKR नं MI ला टाकले मागे, LSG तळाला

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने लखनौला पराभूत करत यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. या विजयासह पंजाबविरुद्धच्या अनिर्णित सामन्यात मिळालेल्या एका गुणासह ते गुणतालिकेत ८ व्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने ७ पैकी फक्त दोन सामने जिंकले अशून उर्वरित ७ पैकी किमान ६ सामने जिंकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. लखनौचा संघाने ८ पैकी फक्त दोन सामने जिंकले असून उर्वरित ६ सामने जिंकण्याचे चॅलेंज निर्माण झाल्यामुळे त्यांनाही प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागेल.
 

Web Title : IPL 2026: प्लेऑफ की दौड़ तेज! केकेआर आगे, एलएसजी नीचे!

Web Summary : पंजाब किंग्स आईपीएल 2026 में सबसे ऊपर है। आरसीबी, एसआरएच और आरआर करीब से पीछा कर रहे हैं। केकेआर की जीत से उम्मीदें बढ़ीं, एलएसजी सबसे नीचे। एमआई को प्लेऑफ के लिए मुश्किल राह का सामना करना पड़ेगा।

Web Title : IPL 2026: Playoff Race Heats Up! KKR Surges, LSG Bottom!

Web Summary : Punjab Kings leads IPL 2026. RCB, SRH, and RR follow closely. KKR's win boosts their hopes, while LSG struggles at the bottom. MI faces a tough road to playoffs.