Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:52 IST2026-04-27T09:50:57+5:302026-04-27T09:52:43+5:30
Mumbai Marine Drive Accident: दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली.

Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटे एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू#Mumbai#Accident#MarineDrivepic.twitter.com/4tEKIg02Qd
— Lokmat (@lokmat) April 27, 2026
मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे ५:४५ च्या सुमारास एक तरूण आणि तरूणी दुचाकीवरून अतिशय वेगाने जात असताना त्यांनी रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक लागताच तिघेही दूरवर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ताबडतोब जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे.
A road accident on Marine Drive in Mumbai claimed three lives early this morning. According to police, a speeding bike hit an elderly man crossing the road. The bike had a man and woman riding on it. All three died on the spot. The accident occurred around 5:45 AM, and the… pic.twitter.com/S4EssuhemM
— IANS (@ians_india) April 27, 2026
मरीन ड्राईव्ह पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अपघाताचा नेमका घटनाक्रम शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी गाड्यांचा वेग प्रचंड असतो. 'स्पीड थ्रिल'च्या नादात अनेक तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पोलिसांनी नागरिकांना वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.