बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:51 IST2026-04-27T12:51:31+5:302026-04-27T12:51:52+5:30

Samrat Chaudhary bulldozer action news: बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राज्यात सुरू असलेल्या बुलडोझर ॲक्शनचे समर्थन केले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत स्वतःच्या घराच्या पायऱ्याही तोडल्या गेल्याचे सांगत त्यांनी 'सुंदर बिहार'चा संकल्प सोडला आहे.

Bihar CM Samrat Chaudhary justifies bulldozer action in Bihar news | बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु

बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु

बिहारचे नवनियुक्त मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राज्यात सुरू असलेल्या 'बुलडोझर' कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. "सुंदर आणि समृद्ध बिहार घडवण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतील," असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी विरोधकांच्या टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या मोहिमेतून त्यांनी स्वतःच्या घरालाही सवलत दिली नसल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

"माझ्या घराच्या पायऱ्याही पाडल्या!"
मुंगेर जिल्ह्यातील तारापूर येथे आपल्या मतदारसंघात बोलताना सम्राट चौधरी यांनी अतिक्रमणविरोधी मोहिमेचे समर्थन केले. ते म्हणाले की, "या मोहिमेमुळे अनेकांची गैरसोय झाली आहे, याची मला कल्पना आहे. पण नियमांसमोर कोणीही मोठे नाही. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान माझ्या स्वतःच्या घराकडे जाणाऱ्या पायऱ्या देखील तोडण्यात आल्या आहेत. जेव्हा कायदा स्वतःच्या घरापासून सुरू होतो, तेव्हा तो सर्वांसाठी समान असतो."

'बुलडोझर राज'चा नियम काय?
सामान्य जनतेमध्ये असलेल्या भीतीवर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. जर कोणाची खाजगी जमीन असेल आणि त्यावर कायदेशीररीत्या बांधकाम झाले असेल, तर अशा बांधकामावर बुलडोझर चालणार नाही. सरकारी जमिनीवर जिथे कुठे अतिक्रमण दिसेल, तिथे कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही.

विरोधकांचा 'योगी मॉडेल'वर हल्ला
सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्याकडून सूत्रे स्वीकारल्यापासून राज्यात बुलडोझर ॲक्शन वेगवान झाली आहे. यावर राष्ट्रीय जनता दल आणि सारख्या विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे. "बिहार हे आता उत्तर प्रदेशातील 'योगी मॉडेल'च्या धर्तीवर बुलडोझर राजची प्रयोगशाळा बनत आहे," असा आरोप विरोधकांनी केला आहे.

Web Title : बिहार: मुख्यमंत्री सम्राट चौधरी के घर की सीढ़ियाँ बुलडोजर से तोड़ीं; कोई छूट नहीं।

Web Summary : बिहार के मुख्यमंत्री सम्राट चौधरी ने 'बुलडोजर' कार्रवाई का समर्थन किया, भले ही उनके अपने घर पर असर पड़ा हो। उन्होंने कहा कि कोई भी कानून से ऊपर नहीं है। सरकार सरकारी जमीन पर अतिक्रमण नहीं बख्शेगी, स्पष्ट किया कि कानूनी निजी संपत्तियां सुरक्षित हैं।

Web Title : Bihar CM's house steps demolished in bulldozer drive; no exceptions.

Web Summary : Bihar's CM, Samrat Choudhary, supports the 'bulldozer' action, even if his own house was affected. He stated that no one is above the law. The government will not spare encroachments on government land, clarifying that legal private properties are safe.