महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल

केशव महाराजवर डाव लावला! पण त्याला संधी मिळणार का? 

By सुशांत जाधव | Updated: April 27, 2026 21:24 IST2026-04-27T21:20:11+5:302026-04-27T21:24:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Mumbai Indians Announces Keshav Maharaj As Replacement For Injured Mitchell Santner | महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल

महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल

Mumbai Indians signs Keshav Maharaj as replacement for Mitchell Santner : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात स्पर्धेत टिकून राहण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असताना मुंबई इंडियन्सच्या संघाला मिचेल सँटनरच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा फिरकीपटू सँटनर याने IPL च्या उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुहेरी धक्क्यातून सावरण्यासाठी मुंबई इंडियन्सनं लाईक टू लाईक रिप्लेसमेंटची चाल खेळत दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराज याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

केशव महाराजवर डाव लावला! पण त्याला संधी मिळणार का? 

मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना दिसणार आहे. ७ सामन्यातील दोन विजय आणि पाच पराभवासह MI गुणतालिकेत तळाला असून प्लेऑप्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात  केशव महाराजला किती संधी मिळणार ते पाहण्याजोगे असेल. कारण सध्याच्या घडीला गझनफर मुख्य फिरकीपटूच्या रुपात MI च्या ताफ्यात असून विल जॅक्सच्या रुपात एक पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध आहे.

"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक

सलग तीन वेळा अनसोल्डचा टॅग

३६ वर्षीय केशव महाराज अनुभवी असला तरी त्याचा IPL अनुभव मर्यादित आहे. IPL  लिलावात सलग तीन वेळा वेळा अनसोल्डचा टॅग लागलेल्या केशव महाराजनं  २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून फक्त दोन सामने खेळले होते. गेल्या डिसेंबरमधील लिलावात त्याला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. त्यामुळे उशिरा मिळालेली ही संधी त्याच्यासाठी मोठी संधी आणि आव्हान दोन्ही ठरणार आहे.

Web Title : मुंबई इंडियंस ने सैंटनर की चोट के बाद केशव महाराज को टीम में शामिल किया।

Web Summary : मुंबई इंडियंस ने चोटिल मिशेल सैंटनर की जगह केशव महाराज को टीम में शामिल किया। प्लेऑफ की चुनौती का सामना करते हुए, एमआई को उम्मीद है कि महाराज का अनुभव स्पिन विकल्पों को बढ़ावा देगा। उन्होंने पहले 2024 में राजस्थान रॉयल्स के लिए दो आईपीएल मैच खेले थे।

Web Title : Mumbai Indians sign Keshav Maharaj after Santner injury setback.

Web Summary : Mumbai Indians signed Keshav Maharaj as a replacement for the injured Mitchell Santner. Facing playoff challenges, MI hopes Maharaj's experience will boost their spin options. He previously played two IPL games for Rajasthan Royals in 2024.