चाकूचा धाक दाखवून एका युवकाला व एका विवाहित महिलेला लुटल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी सातारा शहराजवळ घडली. दोघांकडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे. ...
सातारा येथील नागेवाडी, ता. सातारा येथील गोदाममधून बांधकाम साहित्य चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले सेंट्रिंग प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
पूर्वी झालेल्या भांडणातून अक्षय राजेंद्र गोळे (वय २१, मूळ रा. गजवडी, ता. सातारा. सध्या रा. शाहूपुरी सातारा) याला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अंबेदरे गावाजवळ घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाल ...
फलटण येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविल्याने लाखो रुपयांचे धान ...
सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात असलेल्या दुकानाची दहा ते बाराजणांनी तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...
सातारा येथील गुरुवार बागेजवळ सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामावरून पडून रवी भिकू चव्हाण (वय ३२, रा. सिध्दिविनायक कॉलनी, शाहूपुरी सातारा) या कामगाराचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात ...