तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 15:31 IST2026-04-24T15:05:56+5:302026-04-24T15:31:17+5:30

वाल्मिक कराड याला बीड कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा एका फोन रेकॉर्डिंग करण्यात आला आहे.

Who installed a new Dish TV for Valmik in jail? Viral audio clip reveals VIP facilities | तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल

तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल

गेल्या काही दिवसांपासून बीडचे जिल्हा कारागृह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या गँगचा तुरुंगात असलेला दबदबा आता एका नवीन ऑडिओ क्लिपमुळे चव्हाट्यावर आला आहे. कैदी अझहर पठाणच्या धक्कादायक रेकॉर्डिंगनंतर आता सनी आठवले नावाच्या कैद्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यात त्याने तुरुंग प्रशासनाचे वाल्मिक कराडसोबत असलेले 'अर्थपूर्ण' संबंध उघड केले आहेत.

इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता

व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये सनी आठवलेने गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडसाठी तुरुंगात खास नवीन डिश टीव्ही बसवण्यात आला आहे. कराडकडे बेकायदेशीर सिम कार्ड असून ते कोणाच्या नावावर आहेत, याची माहिती सनीकडे असल्याचा दावा त्याने केला आहे. 'लोकमत' या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

अझहर पठाणचा जबाब बदलण्यासाठी त्याला १० हजार रुपयांची कॅन्टीन आणि बाहेर पैसे देण्याचे आमिष वाल्मिक कराडने दाखवले आहे.

संपूर्ण जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर चालत असून, अधिकारी त्याच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सनीने केला आहे.

अझहर पठाणवर अमानुष अत्याचार?

अझहर पठाणला वाल्मिकच्या गँगने मारहाण केली असून त्याचा खुबा उपसला आहे. आता अधिकारी आणि कराड गँग मिळून त्याच्यावर दबाव आणत आहेत," असेही सनीने या क्लिपमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे, बंदी असतानाही कराडला रात्री साडेआठ वाजता बाहेर काढून त्याचे जबाब घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकारही त्याने समोर आणला आहे.

मी या सगळ्या गोष्टी उघड करत असल्याने आता माझी जेल बदली करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्याने रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे. बाहेरच्या पथकाने येऊन इथे अचानक झडती घेतली, तर कराडचे सगळे काळेबेरे बाहेर येतील." या प्रकरणात आता अंजली दमानिया आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करून चौकशी लावावी, अशी मागणीही त्याने केली आहे.

Web Title : जेल में वीआईपी सुविधा उजागर: कैदी के लिए डिश टीवी, ऑडियो से खुलासा।

Web Summary : बीड जेल में एक ऑडियो क्लिप के बाद जांच शुरू हो गई है जिसमें कैदी वाल्मिक कराड को विशेष सुविधाएँ देने का खुलासा हुआ है, जिसमें डिश टीवी भी शामिल है। एक अन्य कैदी ने आरोप लगाया कि कराड जेल के कामकाज को प्रभावित करता है, गवाहों को धमकाता है और प्रतिबंधों के बावजूद तरजीही व्यवहार प्राप्त करता है। जांच की मांग तेज हो रही है।

Web Title : Jail VIP treatment exposed: Dish TV for inmate, audio reveals nexus.

Web Summary : Beed jail faces scrutiny after an audio clip revealed special treatment for inmate Valmik Karad, including a Dish TV. Another inmate alleges Karad influences jail operations, threatening witnesses and receiving preferential treatment despite restrictions. Calls for investigation are mounting.