"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:26 IST2026-04-24T12:24:17+5:302026-04-24T12:26:17+5:30

TCS Nashik Case : नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) धर्मांतर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

Nashik TCS conversion case victim accused colleagues of harassment and mental torture | "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव

"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव

नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) धर्मांतर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. कंपनीत सुरू असलेला हा प्रकार आतापर्यंत अनेक महिलांनी उघड केला आहे. आता TCS मध्ये काम करणाऱ्या आणखी एका पीडितेने आपल्यावर झालेला अन्याय पोलिसांना सांगितला आहे. महिला तक्रारदाराने तिचे सहकारी आणि या प्रकरणातील आरोपी रझा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांच्यावर लैंगिक छळ आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

पीडित महिला २४ जून २०२५ पासून नाशिकच्या टीसीएस शाखेत 'असोसिएट' पदावर कार्यरत आहे. ती मूळची मालेगावची असून नाशिकमध्ये भाड्याच्या घरात राहते. पीडितेने सांगितलं की, जानेवारी २०२६ मध्ये ती ऑफिसमध्ये असताना शाहरुख कुरेशीने तिला आपल्या डेस्कवर बोलावलं आणि तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. ऑफिसमध्ये कामाबद्दल बोलण्याऐवजी त्याने तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारपूस सुरू केली. "तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का?, तुझा एखादा एक्स-बॉयफ्रेंड आहे का?" असे अनेक अश्लील प्रश्न त्याने विचारले. या प्रश्नांमुळे पीडितेला अत्यंत अस्वस्थ वाटलं.

"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती

सुमारे ६-७ दिवसांनंतर रझा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांनी तिला रझाच्या डेस्कवर बोलावलं. कामाचं निमित्त करून बोलावल्यानंतर रझा मेमनने तिच्या शरीरावर अश्लील टिप्पणी केली. रझा म्हणाला, "तू खूप बारीक आहेस, जिममध्ये गेलीस तर नीट शेपमध्ये येशील आणि चांगली दिसशील." रझानेही तिच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत गलिच्छ प्रश्न विचारले आणि ओडीसी विभागात तिला कोण आवडतं अशी विचारणा केली. यावेळी रझाने शाहरुखकडे पाहून तिच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पणी केली.

"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा

१९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पीडितेने नवीन ड्रेस घातला होता. त्यावेळी रझा मेमनने तिला अनेकवेळा आपल्या डेस्कवर बोलावलं. पीडिता त्याला टाळत होती कारण तो नेहमीच तिच्याकडे वाईट नजरेने पाहायचा, पण सर्वांसमोर हाताने खुणावून बोलावल्यामुळे तिला जावं लागलं. तिथे रझाने तिला धार्मिक आणि पर्सनल प्रश्न विचारले."आज सणाच्या दिवशी तू पूजा करत नाहीस का? तू फक्त नटून-थटून ऑफिसला येतेस का?" रझाने बोलताना ज्या पद्धतीने तिला खालून वरपर्यंत न्याहाळलें, त्यामुळे तिला सर्वांसमोर खूप अपमानित वाटलं.

७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा

TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...

तक्रारीत नमूद केल्यानुसार, शाहरुख कुरेशी सातत्याने तिच्यावर पाळत ठेवत असे. तिची इच्छा नसतानाही तो तिच्या पर्सनल जीवनाबद्दल आणि दैनंदिन कामांबद्दल विचारत राहायचा. तो अनेकदा तिला एकटं गाठून बाहेर फिरायला जाण्यासाठी दबाव टाकायचा. पीडितेने नकार देऊनही तो ऐकत नसे, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली आली होती. पीडितेने आपल्या जबाबात स्पष्ट केले की, तिला कंपनीत तक्रार करायची होती, पण ऑफिसमध्ये रझा मेमन, शाहरुख कुरेशी आणि शफी यांचे वर्चस्व असल्याने तिला भीती वाटत होती. तिचं कोणीही ऐकून घेणार नाही असं तिला वाटलं.

Web Title : TCS नाशिक: महिला से छेड़छाड़, बॉयफ्रेंड के बारे में पूछा, शिकायत दर्ज।

Web Summary : टीसीएस नाशिक की एक कर्मचारी को सहकर्मियों से यौन उत्पीड़न और मानसिक पीड़ा का सामना करना पड़ा। उससे उसके निजी जीवन और दिखावे के बारे में सवाल किए गए, और डेट के लिए दबाव डाला गया, जिससे कार्यस्थल का माहौल शत्रुतापूर्ण हो गया। उसने आरोपियों के प्रभाव के कारण रिपोर्ट करने से डरती थी।

Web Title : TCS Nashik: Woman harassed, questioned about boyfriend, files complaint.

Web Summary : A TCS Nashik employee faced sexual harassment and mental distress from colleagues. She was questioned about her personal life and appearance, and pressured for dates, creating a hostile work environment. She feared reporting due to the accused's influence.